५१३२ अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:14 AM2018-10-30T00:14:56+5:302018-10-30T00:16:46+5:30

अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून अंबाजोगाई, शिरु र व पाटोदा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची भाऊबीज भेट, परिवर्तनिय निधीची रक्कम ३१ आॅक्टोबर पुर्वीच त्यांच्या खात्यावर जमा केली आहे.

5132 visit brothers and sisters to Anganwadi Sevikas | ५१३२ अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट

५१३२ अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट

Next
ठळक मुद्देदिवाळी होणार गोडपाटोदा, शिरु र, अंबाजोगाई तालुक्यातील रक्कम खात्यावर जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सर्वसामान्यांसह गोरगरिब मुलांवर संस्कार करणाऱ्या व राज्याच्या भविष्याचा पाया भक्कम करणाºया अंगणावाडी सेविकांना मागील वर्षीपासून भाऊबीज भेट दिली जाते. यावर्षी या भेटीच्या रक्कमेत ८०० रु पये वाढ करण्यात आली आहे. ही भाऊबीज भेट वेळेत मिळून अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून अंबाजोगाई, शिरु र व पाटोदा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची भाऊबीज भेट, परिवर्तनिय निधीची रक्कम ३१ आॅक्टोबर पुर्वीच त्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तर उर्वरित तालुक्यातील निधीही लवकरच जमा केला जाणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण यांनी सांगितले.
राज्यातील गोरगरिबांच्या मुलांना नर्सरी, प्री-प्रायमरी सारख्या शाळा, कॉन्वेंट शाळांमध्ये पाठवणे शक्य नाही. अशावेळी राज्याचे भविष्य असलेल्या या सर्वसामान्यांच्या मुलांवर संस्कार रुजवण्याचे काम राज्यातील अंगणवाड्यांमधून होते. पुढील पिढीचा पाया भरभक्कम करण्यात अंगणवाडी सेविकांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या वतीने गतवर्षीपासून अंगणवाडी सेविकांना दिवाळीमध्ये दोन हजार रुपयांची ‘भाऊबीज’ भेट दिली जात आहे. यावर्षी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी यामध्ये साडीसाठी ८०० रुपयांची वाढ केली आहे. परंतू भेट म्हणून दिली जाणारी मदत अंगणवाडी सेविकांना वेळेत मिळावी यासाठी बीड जिल्हा परिषदेने तत्परतेने पाऊले उचलली.
जिल्ह्यात ५ हजार १३२ अंगणवाडी सेविका व मदतनिस आहेत. त्यांना भाऊबीज भेट म्हणून २००० रुपये, परिवर्तनिय निधी-मोठी अंगणवाडी २ हजार व मिनी अंगणवाडी एक हजार रुपये या प्रमाणे दिला जाणार आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर हा निधी वेळेत मिळावा यासाठी जि.प. अध्यक्ष सविता गोल्हार, सीईओ अमोल येडगे, महिला व बाल कल्याण सभापती शोभा उद्धव दरेकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून अंबाजोगाई, शिरुर, पाटोदा तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या खात्यावर ‘भाऊबीज’ भेट जमा करण्यात आली आहे. सदर रक्कम ही ३१ आॅक्टोबरपूर्वीच जमा करण्यात आली असून, उर्वरित तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनाही ४ नोव्हेंबर पुर्वी रक्कम दिली जाणार आहे. दिवाळीपुर्वी त्यांना ही मदत करुन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न सध्या प्रशासन करत आहे. वेळेपुर्वीच मदत मिळत असल्याने अंगणवाडी आणि मदतनिसांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
निधी ३३ लाख रुपयांच्या घरात
बीड जिल्ह्यात २४९० मोठ्या अंगणवाडी आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची संख्या जवळपास ४ हजार ९८० आहे. तर ५५० मिनी अंगणवाड्या आहेत. सेविका आणि मदतनीस यांची संख्या ११०० इतकी आहे. भाऊबीज भेट, परिवर्तनीय निधी व गणवेशासाठी (साडी) वितरित केला जाणारा निधी जवळपास ३३ लाख रुपयांच्या घरात आहे.

Web Title: 5132 visit brothers and sisters to Anganwadi Sevikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.