५६९ रुग्णांना सुटी, २६५ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:59+5:302021-06-05T04:24:59+5:30
बीड : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट होत असल्याने समाधान व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मृत्यूसत्र कायम आहे, ...
बीड : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट होत असल्याने समाधान व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मृत्यूसत्र कायम आहे, त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. तसेच २६५ नवे रुग्ण निष्पन्न झाले तर ५६९ कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
गुरुवारी जिल्ह्यातील ३ हजार ४१४ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले. यात २६५ जण पॉझिटिव्ह आले तर ३ हजार १४९ निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १४, आष्टी ३१, बीड ५७, धारुर १५, गेवराई ३१, केज ३३, माजलगाव १९, परळी ५, पाटोदा १५, शिरुर २९ व वडवणी तालुक्यातील १६ जणांचा समावेश आहे. तसेच दिवसभरात ५६९ जण कोरोनामुक्त झाले.
दरम्यान, मागील २४ तासात जिल्ह्यात १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात बीड तालुक्यातील बोरफडी येथील ५० वर्षीय महिला व मांडवा येथील ६० वर्षीय महिला, माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी येथील ७० वर्षीय पुरुष, कोथिंबीरवाडी येथील ६५ वर्षीय महिला, खरात आडगाव येथील ४५ वर्षीय पुरुष व दिवाणपूर येथील ५३ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील ६५ वर्षीय पुरुष व घाटनांदूर येथील ७२ वर्षीय महिला, नाळवंडी (ता. पाटोदा) येथील ३५ वर्षीय पुरुष व चिंचाळा (ता. वडवणी) येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८७ हजार ८९४ इतकी झाली असून यापैकी ८२ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर आतापर्यंत २,०३२ जणांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार ६०३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, डीएचओ आर.बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी.के. पिंगळे यांनी दिली.
---