५९ हिस्ट्रीशिटर तपासले, ८ गुन्हेगार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:35 AM2021-08-15T04:35:15+5:302021-08-15T04:35:15+5:30
बीड : जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट रोजी रात्री राबविलेल्या मोहिमेत सुमारे ...
बीड : जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट रोजी रात्री राबविलेल्या मोहिमेत सुमारे ५६ गुन्हेगारी वस्त्यांची झाडाझडती घेऊन ५९ हिस्ट्रीशिटर गुन्हेगार तपासण्यात आले. यावेळी ८ पाहिजे/ फरारी पकडण्यात आले.
वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी नाकाबंदी, रात्रगस्त तसेच ऑल आउट ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार १३ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते सकाळी साडेपाच वाजेदरम्यान ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले. २८ ठाण्यांतील ७३ अधिकारी आणि ३८४ अंमलदार एकाचवेळी रस्त्यावर उतरले. २८ समन्स व १२ वॉरंट बजावण्यात आले. २८० वाहनांवर कारवाई करून ५९ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. १२ लॉजेस, ५ हॉटेल तपासण्यात आले. अवैध दारूच्या ५ आणि जुगाराच्या २ कारवाया करण्यात आल्या. दुचाकीचोरीतील २ आणि खुनाच्या प्रयत्नातील १ अशा तीन आरोपींना अटक केली.