जीव वाचविण्यासाठी दीड महिन्यात ५९५ ऑक्सिजन खाटा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:35 AM2021-05-08T04:35:32+5:302021-05-08T04:35:32+5:30

बीड : कोरोनाबाधितांसह संशयितांना ऑक्सिजनची गरज भासत आहे; परंतु खाटाच अपुऱ्या पडत होत्या. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने मागील ...

595 oxygen beds ready in a month and a half to save lives | जीव वाचविण्यासाठी दीड महिन्यात ५९५ ऑक्सिजन खाटा तयार

जीव वाचविण्यासाठी दीड महिन्यात ५९५ ऑक्सिजन खाटा तयार

Next

बीड : कोरोनाबाधितांसह संशयितांना ऑक्सिजनची गरज भासत आहे; परंतु खाटाच अपुऱ्या पडत होत्या. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने मागील दीड महिन्यात तब्बल ५९५ ऑक्सिजन खाटा तयार केल्या आहेत. यात जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील इमारतींमध्ये ३६१, तर शासकीय आयटीआयमधील २३४ खाटांचा समावेश आहे. नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रशासन सतर्कता बाळगण्याचा प्रयत्न करीत आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चिंताजनक म्हणजे यातील बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग धावपळ करत आहे. सुरुवातीला जिल्हा रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडल्या. त्यानंतर नर्सिंग हाॅस्टेल आणि परिसरातील छोट्या इमारती ताब्यात घेऊन तेथेही खाटा तयार करण्यात आल्या. सध्या बीड शहरांत तब्बल ९१५ ऑक्सिजन खाटा तयार झाल्या आहेत. यातील ५९५ खाटा या अवघ्या दीड महिन्यात तयार करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सचिन आंधळकर हे यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.

२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध

मागील दीड महिन्यात १५० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर जिल्हाभरात उपलब्ध झाले होते. ज्यांना ऑक्सिजन कमी प्रमाणात लागते त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी पुणे येथील एका संस्थेने आणखी ५० ओटू कॉन्संट्रेटर मोफत दिले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाला लाभ झाला आहे. यातील २५ कॉन्संट्रेटर आयटीआयमध्ये देण्यात आले आहेत.

मंडलेचा, आंधळकर पडद्यामागचे हिरो

जिल्हा रुग्णालयातील डॉ. पारस मंडलेचा व डॉ. सचिन आंधळकर हे सध्या पडद्यामागची भूमिका बजावत आहेत. डॉ. आंधळकर रुग्णांचे हाल होणार नाहीत, यासाठी खाटांचे नियोजन करतात, तर खाटांवरील रुग्णाचा जीव जावू नये, यासाठी डॉ. मंडलेचा ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचे नियोजन करतात. हे दोघेही पडद्यामागचे हिरो ठरत आहेत.

---

नवे वाढलेले ऑक्सिजन बेड नर्सिंग हॉस्टेल २६०

आय वॉर्ड ३०

एनआरसी २१

जुना प्रसूती वॉर्ड २८

डायलिसिस १६

फिवर क्लिनिक ६

आयटीआय २३४

एकूण ५९५

जुन्या इमारतीतील आगोदरचे ऑक्सिजन बेड ३२०

===Photopath===

070521\07_2_bed_8_07052021_14.jpeg

===Caption===

आयटीआयमध्ये २३४ ऑक्सिजन खाटा तयार करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाहणी करून ओटू कॉन्सट्रेटरची माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष शहाणे, डॉ.सचिन आंधळकर, डॉ.अमित बायस, इन्चार्ज स्वाती माळी आदी.

Web Title: 595 oxygen beds ready in a month and a half to save lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.