संजय गांधी निराधार योजनेच्या खातेदारांना खात्यावर ६ कोटी ९४ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:47+5:302021-04-06T04:32:47+5:30
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाने परळी तालुक्यातील संजय गांधी निराधार (श्रावणबाळ) योजनेच्या खातेदारांना ६ कोटी ९४ लाख ...
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाने परळी तालुक्यातील संजय गांधी निराधार (श्रावणबाळ) योजनेच्या खातेदारांना ६ कोटी ९४ लाख रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ व सचिव तथा परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोना परिस्थितीत निराधार नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. सध्याच्या स्थितीत सर्वसामान्य नागरिक प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित योजनेचे पैसे मिळावेत, अशी मागणी निराधारांकडून होत होती. याबाबत पालकमंत्री मुंडे यांना अवगत केले असता, त्यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. निधी मिळाल्याने खातेदारांना त्यांचे पैसे ५ एप्रिल रोजी वर्ग करण्यात आले आहेत. तब्बल ६ कोटी ९४ लाख रुपये संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, सचिव तथा परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ व समितीच्या सर्व सदस्यांनी पालकमंत्री मुंडे यांचे आभार मानले आहेत. खात्यात पैसे जमा झाल्याने संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्त्यांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.