येडेश्वरी कारखान्यात ६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:31 AM2021-04-14T04:31:13+5:302021-04-14T04:31:13+5:30

तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील येडेश्वरी साखर कारखान्याने सातव्या गळीत हंगामात प्रतिदिन ३ हजार ९०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ...

6 lakh metric tons of sugarcane crushed in Yedeshwari factory | येडेश्वरी कारखान्यात ६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

येडेश्वरी कारखान्यात ६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

Next

तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील येडेश्वरी साखर कारखान्याने सातव्या गळीत हंगामात प्रतिदिन ३ हजार ९०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. गाळप हंगामाच्या १७२ व्या दिवशी ६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तसेच कारखान्याच्या १० मॅगावॅट को-जनरेशन प्रकल्पाद्वारे ३ कोटी ६० लाख ८३ हजार ५०० वीज युनिटचे उत्पादन करण्यात आले. यापैकी १ कोटी ६३ लाख ७५ हजार २०० वीज युनिट वीज विद्युत वितरण कंपनीला वितरित करण्यात आली. उर्वरित वीज कारखान्यास वापरण्यात आली. यासोबतच ४५ केएलपीडी क्षमतेचा आसवनी प्रकल्पात १५८ दिवसांत ७४ लाख ४० हजार ३४९ लीटर स्पिरीट व इथेनाॅलचे उत्पादन करण्यात आले आहे.

===Photopath===

130421\deepak naikwade_img-20210310-wa0022_14.jpg

Web Title: 6 lakh metric tons of sugarcane crushed in Yedeshwari factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.