९१४ पैकी ६० घरकूल पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:32 AM2021-03-19T04:32:39+5:302021-03-19T04:32:39+5:30

गेवराई : गरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून देशभरात सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गेवराई शहरात ९१४ पैकी ६० ...

60 out of 914 households completed | ९१४ पैकी ६० घरकूल पूर्ण

९१४ पैकी ६० घरकूल पूर्ण

googlenewsNext

गेवराई : गरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून देशभरात सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गेवराई शहरात ९१४ पैकी ६० घरकुलांचे काम पूर्ण झाले असून ३१० घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

गेवराई नगरपरिषदेने ही योजना राबवित पहिल्या टप्प्यातच तब्बल ९१४ घरकूल प्रस्तावांना मंजुरी मिळविली. त्यापैकी ६० घरकूल पूर्ण झाले तर ३१० घरे पूर्णत्वाकडे आहेत.

शहरातील गरजवंत कुटुंबांना हक्काचे पक्के छताचे घर मिळावे यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष,नगरसेवकांना घरोघरी जाऊन कोणीही लाभार्थी वंचित राहू नये म्हणून साखळी पद्धतीने कामे केली. आ. लक्ष्मण पवार यांनी मंत्रालय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ९१४ घरकूल मंजूर करून आणले. प्रत्येकी २ लाख पन्नास हजाराचा संपूर्ण निधी खेचून आणल्याने आज मितीला ६० घरकूल पूर्ण झाले. तर ३१० घरे पूर्णत्वाकडे आहेत. नवीन डिपीआर मध्ये नव्याने घरकूल योजनेसाठी अर्ज केलेल्या नागरिकांनाही लवकरच घरकुलाचा लाभ मिळणार आहे. ज्या नागरिकांनी घरकुलाचे काम सुरू केले नाही, किंवा सुरू आहे. अशा लाभार्थ्यांनी लवकरच आपले घराचे काम पूर्ण करावे असे आवाहन नगराध्यक्ष सुशील जवंजाळ यांनी केले आहे.

यांनाही मिळणार लाभ

शहरातील संजयनगर, साठेनगर, भीमनगर, इस्लामपुरा या भागातील अतिक्रमण धारकांनाही लवकरच घरकूल योजनेचे लाभ मिळणार असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे नगराध्यक्ष सुशील जवंजाळ यांनी सांगितले.

===Photopath===

180321\18bed_14_18032021_14.jpg

===Caption===

गेवराई शहरात ६० घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.

Web Title: 60 out of 914 households completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.