३ टक्के सवलतीमुळे डिसेंबरमध्ये मालमत्ता खरेदी- विक्रीचे ६९१९ व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:46 AM2021-01-08T05:46:41+5:302021-01-08T05:46:41+5:30

बीड : जिल्ह्यात मुद्रांक व नोंदणी शुल्कातून डिसेंबरअखेरपर्यंत ८२ कोटी ७६ लाखांचा महसूल वसूल झाला. शासनाने मुद्रांक शुल्कात तीन ...

6919 transactions of property purchase and sale in December due to 3% discount | ३ टक्के सवलतीमुळे डिसेंबरमध्ये मालमत्ता खरेदी- विक्रीचे ६९१९ व्यवहार

३ टक्के सवलतीमुळे डिसेंबरमध्ये मालमत्ता खरेदी- विक्रीचे ६९१९ व्यवहार

googlenewsNext

बीड : जिल्ह्यात मुद्रांक व नोंदणी शुल्कातून डिसेंबरअखेरपर्यंत ८२ कोटी ७६ लाखांचा महसूल वसूल झाला. शासनाने मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलतीची घोषणा केल्याने मागील चार महिन्यांत व्यवहारांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. बीड विभागाला दिलेल्या महसूल उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण एकशे पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

कोरोना लॉकडाऊन तसेच निर्माण झालेल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे मालमत्ता खरेदी- विक्रीच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्याचा परिणाम शासनाच्या तिजोरीवरही झाला होता. त्यामुळे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत दस्त नोंदणी केल्यास ३ % मुद्रांक शुल्कात सवलत घोषित केली होती. या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करीत सुटीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवून दस्तनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तर ३१ डिसेंबरपूर्वी दस्त निष्पादन करून मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील ४ महिने दस्ताची नोंदणीची योजना जाहीर करण्यात आली. त्यामुळे शासनाच्या सवलतीचा लाभ उचलत डिसेंबरमध्ये नागरिकांनी मालमत्ता खरेदी- विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले.

डिसेंबरमध्ये जिल्ह्यात ६ हजार ९१९ व्यवहार झाले. २०२० या वर्षात सर्वाधिक व्यवहार डिसेंबरमध्ये झाल्याचे जिल्हा मुद्रांक कार्यालयाचे आकडे सांगतात.

----------

८२ कोटींचा महसूल मिळाला

जिल्हा मुद्रांक कार्यालयाला चालू आर्थिक वर्षात ७० लाख रुपयांचे इष्टांक दिले होते. जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत या ७२ कोटी २५ लाख ४७ हजार रुपयांचा महसूल वसूल झाला होता. डिसेंबरमध्ये १० कोटी ५१ लाख ६५ हजार ३२८ रुपये महसूल वसूल झाला. सप्टेंबर ते डिसेंबर कालावधीत शासनाने नियमांच्या अधीन राहून मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्कात तीन टक्के सवलत जाहीर केल्याने या चारही महिन्यांत व्यवहार संख्या वाढल्याचे दिसून आले.

-----

डिसेंबर महिन्यातील खरेदी- विक्री व्यवहार ६९१९

------

महिन्यानुसार झालेले खरेदी- विक्रीचे व्यवहार

जानेवारी ४०४१

फेब्रुवारी ३३८७

मार्च २६७०

एप्रिल ००००

मे १३३२

जून ४०६०

जुलै ४५६२

ऑगस्ट २८५६

सप्टेंबर ५२०३

ऑक्‍टोबर ५०८६

नोव्हेंबर ४७७६

------------

सवलतीमुळे दस्त संख्येत वाढ

मालमत्ता खरेदी- विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत सवलत योजना जाहीर केली होती. ३१ डिसेंबरपर्यंत निष्पादित केलेले व मुद्रांक शुल्क अदा केलेले दस्त पुढील चार महिने एप्रिल- २०२१ पर्यंत नोंदणीसाठी याच दरामध्ये मुभा राहणार आहे. त्यामुळे डिसेंबरमधील दस्त संख्येत निश्चितच वाढ झाली. बीड जिल्ह्याने मुद्रांक व नोंदणी शुल्काची शासनाने दिलेली उद्दिष्टपूर्ती केली आहे.

-अनिल नढे, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड.

-------

कोरोनाच्या नियमांचे केले पालन

शासनाच्या सवलत योजनेमुळे डिसेंबर महिन्यात जिल्हा मुद्रांक कार्यालय तसेच दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये पक्षकारांची गर्दी होत होती. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता ऑनलाइन मुद्रांक शुल्क चलन भरणा करावा व दस्त निष्पादित करण्याचे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सचे पालन झाले. मात्र, कार्यलयाबोहरच्या परिसरात काही लोक विनामास्क व नियमांकडे दुर्लक्ष करीत फिरताना दिसून आले.

Web Title: 6919 transactions of property purchase and sale in December due to 3% discount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.