दरोड्याच्या तयारीतील ७ सराईत आरोपी जेरबंद; गावठी कट्टा, जिवंत काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 05:23 PM2024-02-21T17:23:13+5:302024-02-21T17:23:20+5:30
सातही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत
- मधुकर सिरसट
केज : अंबाजोगाईकडून नेकनूरकडे चारचाकीतून ( एम एच 46 सी एम 1934 ) जाणाऱ्या ७ सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मंगळवारी मध्यरात्री केज येथील बसस्थानक परिसरातून पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून एक गावठी कट्टा, ५ जिवंत काडतुस आणि दरोडा टाकण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले.
सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारावरून केज बसस्थानक परिसरात सापळा लावला. मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान संशयीत चारचाकीला अडविण्यात आले. झडती घेतली असता आरोपींकडे एक गावठी कट्टा, ५ जिवंत काडतुसे, २ लोखंडी रॉड, स्क्रु ड्रायव्हर, एक लाकडी दांडका आढळून आला. याप्रकरणी आज पहाटे पोलीस नाईक विकास चोपने यांच्या फिर्यादीवरून गणेश पांडुरंग भोसले, (रा. यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई ), हरीष तोमर देवडीगा, (रा. बजेगली ता. कारकला जि. उडपी राज्य कर्नाटक ह. मु. डोंबीवली, मुंबई जि. मुंबई,) , नारायण मंगळा करण, (रा. महेशा ता. कृष्णप्रसाद जि. पुरी राज्य ओडीसा ह.मु. सायन मुंबई,), श्रीनिवास आशाअली बारगम,( रा. संत ज्ञानेश्व नगर गर्व्हमेंट कॉलनीच्या बाजुला बांद्रा पूर्व मुंबई,), श्रावण शिवाजी गायकवाड,( रा. बोरीवली मुंबई,) , दिपक दशरथ चाटे ऊर्फ ताठे,(रा, धर्मेनाका कामगार नगर-2 मुंबई,), नामदेव परसु पोवार, (रा. कामोठा नवी मुंबई ता. पनवेल जि. रायगड) या ७ आरोपी विरुध्द कलम 399 भादंवि सह कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा नुसार केज पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर , अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस कर्मचारी विकास चोपने, अनिल मंदे, दिलीप गित्ते, अशपाक ईनामदार, भुंबे, शहादेव म्हेत्रे, महादेव बहिरवाळ, प्रकाश मुंडे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत.