राक्षसभुवनमध्ये ७० ब्रास वाळूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:24+5:302021-05-18T04:35:24+5:30
गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथे गोदावरी नदी पात्राशेजारी अवैधरीत्या उपसा करून ठेवलेला ७० ब्रासचा साठा गेवराई आणि अंबड ...
गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथे गोदावरी नदी पात्राशेजारी अवैधरीत्या उपसा करून ठेवलेला ७० ब्रासचा साठा गेवराई आणि अंबड येथील तहसीलदारांच्या पथकाने संयुक्त कारवाईत करत जप्त केला. जप्त केलेली वाळू गेवराई येथील शासकीय विश्रामगृहात आणण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.
तालुक्यातील राक्षसभुवन येथे अवैधरित्या वाळूचा साठा केल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत मिळाल्यावरून येथील तहसीलदार सचिन खाडे व जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार जे.डी.कर्नाळ यांच्या संयुक्त पथकाने सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राक्षसभुवन येथील गोदावरी नदी पात्र परिसरात छापा मारला. पात्राजवळ काही वाळू माफियांनी अवैधरीत्या उपसा करून ठेवलेला ७० ब्रास वाळूचा साठ जप्त करण्यात आला. साठा करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती तहसीलदार खाडे यांनी दिली. गेवराई व अंबड येथील तहसीलदारांच्या पथकातील तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
===Photopath===
170521\sakharam shinde_img-20210517-wa0032_14.jpg