७०९ कामगारांना ५७ लाखांची दिवाळी बोहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:04 AM2018-11-06T00:04:45+5:302018-11-06T00:06:33+5:30

जिल्ह्यातील ७०९ कामगारांना दिवाळी सणानिमित्त बोहणी, पगारी रजेचे ५७ लाख ९४ हजार ८८४ रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आले असून श्रमिकांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच बीड जिल्हा परिषदेच्या ३१ कर्मचाऱ्यांना जि. प. प्रशासनाने दिवाळीचे औचित्य साधत पदोन्नतीची भेट दिली आहे.

709 workers to pay Rs 57 lakh for Diwali Bohani | ७०९ कामगारांना ५७ लाखांची दिवाळी बोहणी

७०९ कामगारांना ५७ लाखांची दिवाळी बोहणी

Next
ठळक मुद्देश्रमिकांची दिवाळी : माथाडी, असंरक्षित कामगार मंडळातील नोंदणीकृत कामगारांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील ७०९ कामगारांना दिवाळी सणानिमित्त बोहणी, पगारी रजेचे ५७ लाख ९४ हजार ८८४ रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आले असून श्रमिकांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच बीडजिल्हा परिषदेच्या ३१ कर्मचाऱ्यांना जि. प. प्रशासनाने दिवाळीचे औचित्य साधत पदोन्नतीची भेट दिली आहे.
महाराष्टÑ शासनाच्या कामगार विभागांतर्गतजिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळामार्फत वेतन घेत असलेल्या नोंदणीकृत कामगारांना दिवाळी सणासाठी दिवाळी बोहणी वाटप करण्याबाबत कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक कामगार आयुक्त तथा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष एस. जी. मुंडे यांनी निर्णय घेतला. त्यानुसार मंडळाचे सचिव एस. पी. राजपूत यांनी दिवाळी बोहनी वाटपाची कार्यवाही केली.
बीड, माजलगाव आणि अंबाजोगाई येथील मोंढा, बॅटको ट्रान्सपोर्ट, बीड एस. टी. पार्सल विभाग, वखार महामंडळ, बीड, अंबाजोगाई, परळी येथील बियाणे महामंडळ, परळी येथील रेल्वे स्थानकातील माल धक्का तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामातील कार्यरत नोंदणीकृत श्रमजीवी कामगारांचा लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे. सदरील बोनसची रक्कम वाटप करण्यासाठी मंडळाचे लेखापाल ए. डी. सपकाळ, पी. ए. कुरेश्ी, एम. व्ही. गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
दिवाळीपूर्वी कामगारांना बोनसची रक्कम मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात असून, याचा बाजारपेठेलाही आधार होणार आहे.
बीड जि.प.च्या ३१ कर्मचाºयांना पदोन्नतीची दिवाळी
बीड : येथील जिल्हा परिषदेतील पात्र ३१ कर्मचाºयांना धनत्रयोदशीच्या दिवशी पदोन्नतीचे आदेश तर संधी न मिळालेल्या पात्र कर्मचाºयांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देत त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाºयांच्या पदोन्नत्या प्रलंबित होत्या. या कर्मचाºयांना बढतीची प्रतीक्षा होती. पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाºयांना सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पदोन्नतीचे आदेश देत दिवाळी भेट दिली.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील व्रणोपचारकांची ३८ पदे आहेत. त्यापैकी १९ पदे रिक्त होती.
जवळपास बारा वर्षांपासून ही पदे रिक्त होती. किमान आठवी उत्तीर्ण असणारे व पशुवैद्यकीय दवाखान्यात एक वर्ष काम केलेले परिचर सदरील पदासाठी
पात्र ठरतात.
खुल्या प्रवर्गातील १२ पदांसाठी समुपदेशन घेऊन आदेश वितरित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील १३ वरिष्ठ सहायक तसेच १ कनिष्ठ प्रशासन अधिकाºयाची पदोन्नती झाली.
आरोग्य विभागातील ३ आरोग्य सहायक (पुरुष) व २ आरोग्य सहायक (स्त्री) यांनाही समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आल्या.
बांधकाम विभागातील ५ स्थापत्य अभियांत्रिकी , ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील ५, परिचर ५ आणि ३१ ग्रामसेवकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला. तर शिक्षण विभागातील ११ सहशिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ देण्यात आला.
बारा वर्ष सेवा केलेल्या परंतू पदोन्नतीची संधी मिळू न शकलेल्या कर्मचाºयांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी स्वत: लक्ष घालून दिवाळी कालावधीत पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सहकारी अधिकाºयांना सूचित करुन लक्ष घातले होते.
त्यानुसार सर्व सोपस्कर ५ नोव्हेंबर रोजी पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे या कर्मचाºयांना त्यांच्या सेवाकार्यातील ही भेट कायम स्मरणात राहणार आहे.

Web Title: 709 workers to pay Rs 57 lakh for Diwali Bohani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.