माजलगाव तालुक्यात वर्षभरात घडले ७२६ गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:48+5:302021-01-01T04:22:48+5:30
माजलगाव : तालुक्यात मागील वर्षभरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येते. ७२६ गुन्हे दखलपात्र स्वरूपाचे आहेत, तर ...
माजलगाव : तालुक्यात मागील वर्षभरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येते. ७२६ गुन्हे दखलपात्र स्वरूपाचे आहेत, तर ९५८ गुन्हे अदखलपात्र स्वरूपाचे आहेत. यात शहर हद्दीत ७१७ गुन्हे घडले असून, ग्रामीण हद्दीत ९६० गुन्हे घडले आहेत.
जानेवारी ते डिसेंबर कालावधीत माजलगाव तालुक्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीरसह किरकोळ १६७७ गुन्हे घडले आहेत. माजलगाव शहर हद्दीत दखलपात्र गुन्ह्यांत एक खून नोंदला आहे, तर जबरी चोऱ्या ४, घरफोड्या १०, साध्या चोऱ्या ३०, विनयभंग १०, गर्दी मारामाऱ्या ६, फसवणुकीचे ७ तर खुनाचा प्रयत्न करण्याचे ३ गुन्हे दाखल आहेत. अपहारप्रकरणी १, पळवून नेण्याचे २, स्त्री अत्याचार करणाऱ्याविरोधात ४९८ चे १६ गुन्हे दाखल आहेत. असे एकूण ३९५ दखलपात्र गुन्हे व ३२८ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.
तालुक्याच्या ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत ९६१ दखलपात्र, अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. ज्यात खुनाचा १ गुन्हा, खुनाचा प्रयत्न करण्याचे ७ गुन्हे, बलात्काराचे ६, जबरी चोऱ्या २, घरफोड्या २, अपहार १ तर ठकबाजीचे ३ गुन्हे दाखल आहेत. अपहरण करण्याचे ७, अपहरणाचा प्रयत्न करण्याचे २ तर विनयभंगाचे ७ गुन्हे दाखल आहेत. तसेच अपघाताचे २०, ॲट्रॉसिटीचे २, तर जुगार खेळणाऱ्यांविरोधात ४८ गुन्हे दाखल आहेत.
माजलगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत मोठ्या प्रमाणावर चोरीचे गुन्हे घडले आहेत. १-२ चोऱ्यांंचे तपास वगळता अनेक तपास तसेच रखडले आहेत. यामुळे नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी माजलगाव पोलीस विभागाला अधिक क्षमतेने काम करावे लागणार आहे.