बीड जिल्ह्यात उज्ज्वला योजनेचे ७४ टक्के लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:45 AM2019-01-05T00:45:01+5:302019-01-05T00:46:46+5:30

सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंपाकासाठी लाकडे जाळू नये तर एलपीजीचा वापर करावा यासाठी राबविलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ग्राहकांना लाभ देण्यात आला आहे.

74 percent beneficiaries of Ujjawla scheme in Beed district | बीड जिल्ह्यात उज्ज्वला योजनेचे ७४ टक्के लाभार्थी

बीड जिल्ह्यात उज्ज्वला योजनेचे ७४ टक्के लाभार्थी

Next
ठळक मुद्देप्रधानमंत्री उज्वला योजना : जिल्ह्यात १ लाख ५७ हजार लाभार्थी, ग्रामीण भागात दिल्या जाणार सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंपाकासाठी लाकडे जाळू नये तर एलपीजीचा वापर करावा यासाठी राबविलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ग्राहकांना लाभ देण्यात आला आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमचे विक्री अधिकारी केतन कर्णिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी योजनेतील बदल व ग्राहकांच्या सुलभ सुविधेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेविषयी माहिती दिली.
कर्णिक म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना उज्वला योजनेमुळे मोठ्या प्रमाणात गॅस कनेक्श्न घेता आले आहेत. त्यामुळे महिला स्वयंपाकासाठी लाकूड जाळण्याऐवजी गॅसचा वापर करु लागल्या आहेत. १ मे २०१६ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यात जवळपास ७४ टक्के नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, गॅस वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना सुलभ सुविधा देण्यासाठी कंपनीच्या वतीने उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
अनेक नागरिकांना १४ किलो सिंलेंडरची किंमत परवडणारी नसते. त्यामुळे त्यांच्यासाठी ५ किलोचे सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागात बहुतांश शेतक री किंवा मजूर वर्ग आहे, त्यांच्या सुविधेसाठी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस ते घरी असताना गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यापुर्वी ३१ गॅस एजन्सी कार्यरत होत्या. आता शिरुर व पाटोदा येथेही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गॅस वापराबाबत ग्रामीण भागात अजूनही गैरसमज आहेत, ते दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम देखील राबवली जात आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी किंवा अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे कर्णीक यांनी यावेळी सांगीतले.
मार्गदर्शन सेवा : अपघात टाळण्यासाठी मोफत सुविधा
गॅस वापराबाबत सुरुवातीलाच महिलांना व घरातील इतर सदस्यांना माहिती दिली जाते.
गॅस अपघात टाळण्यासाठी रेग्यूलेटर बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर देखील गॅसचा वास आला तर तत्काळ नागिरकांनी १९०६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा, त्यानंतर नजिकच्या एजन्सीवरील कामगार भेट देऊन दुरुस्ती करतील.
नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व धूरामुळे होणाऱ्या आजारापासून दूर रहावे असे आवाहन केतन कर्णिक यांनी केले.

Web Title: 74 percent beneficiaries of Ujjawla scheme in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.