ई-केवायसी, बीज प्रक्रियेसाठी ७४० ठिकाणी मेळावे

By शिरीष शिंदे | Published: October 1, 2023 06:53 PM2023-10-01T18:53:05+5:302023-10-01T18:54:29+5:30

कृषिमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविला जातोय अभिनव उपक्रम.

740 places to meet for ekyc seed processing | ई-केवायसी, बीज प्रक्रियेसाठी ७४० ठिकाणी मेळावे

ई-केवायसी, बीज प्रक्रियेसाठी ७४० ठिकाणी मेळावे

googlenewsNext

शिरीष शिंदे, बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून २ ऑक्टोबर हा दिवस बीज प्रक्रिया व ई-केवायसी दिन म्हणून कृषी विभागाच्या वतीने साजरा केला जाणार आहे. सदरील एकाच दिवशी जिल्हाभरात ७४० ठिकाणी मेळावे घेतले जाणार असून त्या माध्यमातून बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक पीएम किसानसाठी ई-केवायसी करून घेतली जाणार आहे.

गाव निवडताना प्रथमत: ग्रामपंचायत मुख्यालयाचे गाव घेतले जाईल. सकाळी आठ वाजता पहिले गाव, दुपारी एक वाजता दुसरे गाव आणि सायंकाळी साडेपाच वाजता तिसरे गाव अशा पद्धतीने एका दिवसात तीन गावे मोहिमेमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गावांची संख्या जास्त असल्यास सदर मोहीम दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी राबवली जाणार आहे. काही गावात कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी हेदेखील कॅम्प आयोजित करतील. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व ई-केवायसीसाठी पुढे यावे आणि लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे. दरम्यानच्या काळात मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून कोणत्या गावात कोणत्या दिवशी कोण क्षेत्रीय कर्मचारी बीज प्रक्रिया व ई-केवायसी कॅम्पसाठी उपस्थित राहणार याची यादी विविध गावांमधील व्हाॅट्सॲप ग्रुपवर प्रसारित केली जाणार आहे.

असे होतील मेळावे
बीड : ११४
पाटोदा : ४१
आष्टी : ५९
शिरुर कासार : ४३
माजलगाव : ३३
गेवराई : ८१
धारूर : ५८
वडवणी : ३६
अंबाजोगाई : ९२
केज : १०८
परळी : ७५
एकूण : ७४०

Web Title: 740 places to meet for ekyc seed processing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी