७८ नवे रुग्ण, एक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:53+5:302021-08-26T04:35:53+5:30

जिल्ह्यात ४ हजार ३१२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ४ हजार २३४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर, ७८ ...

78 new patients, one death | ७८ नवे रुग्ण, एक मृत्यू

७८ नवे रुग्ण, एक मृत्यू

Next

जिल्ह्यात ४ हजार ३१२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ४ हजार २३४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर, ७८ जण बाधित आढळून आले. अंबाजोगाई, परळी, माजलगाव, पाटोदा या चार तालुक्यात एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. नव्या बाधितांमध्ये आष्टी तालुक्यात ३३, बीड तालुक्यात १२, धारुरमध्ये ०६, गेवराईत ०१, केजमध्ये ०४, शिरुरमध्ये ०६, वडवणीत ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी एका मृत्यूची नोंद झाली. आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील ८५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला तर, दिवसभरात १२१ जण कोरोनामुक्त झाले.

एकूण बाधितांची संख्या आता १ लाख ६५५ झाली आहे तर, कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ९६ हजार ९१६ इतका झाला आहे. बळींची संख्या २ हजार ७०० झाली आहे. सध्या १ हजार ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: 78 new patients, one death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.