समृद्ध ग्रामच्या मिनी स्पर्धेत जिल्ह्यातील ७८ गावे पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:30 AM2021-03-15T04:30:04+5:302021-03-15T04:30:04+5:30
पाणी फाऊंडेशनच्या या स्पर्धेत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १३४ गावांनी सहभाग घेतला होता. पहिल्या टप्प्यात १२० गुणांची स्पर्धा ...
पाणी फाऊंडेशनच्या या स्पर्धेत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १३४ गावांनी सहभाग घेतला होता. पहिल्या टप्प्यात १२० गुणांची स्पर्धा घेण्यात आली. जल बचतीच्या साधनांचा वापर, ठिबक व तुषार सिंचनाखाली असलेली जमीन, रबी, खरीप व बारमाही लागवडीखालील पिके, स्वच्छ पेयजल, गावातील बचत गट, आरक्षित कुरणक्षेत्र, झाडे व जंगले वाढविणे, अस्तित्वात असलेल्या जुन्या रचनांचे सर्वेक्षण, विहिरीची पाणीपातळी मोजणे, गाव शिवारात असलेल्या विहिरी व बोअरवेलची संख्या मोजणे, गावात पर्जन्यमापक बसविणे व पावसाच्या नोंदी ठेवण्यासाठी रजिस्टर तयार करणे या सर्व कामांचा यात समावेश होता.
राज्यात ४० पैकी बीडचे पाच तालुके
समृद्ध गाव स्पर्धेच्या पुढील टप्प्याचे नियोजन सुरू असून, ३८० गुणांची ही स्पर्धा होणार आहे. सहभागी १३४ गावांतील जलमित्र नियोजन करून कामाची तयारी करीत आहेत. राज्यातील ४० पैकी ५ तालुके बीड जिल्ह्यातील आहेत. यात आष्टी, बीड, केज, धारूर, अंबाजोगाईचा समावेश आहे.
गावे समृद्ध होणार
सत्यमेव जयते वॉटर कपच्या यशानंतर समृद्ध ग्राम स्पर्धा निश्चितच बीड जिल्ह्यातील गावांना समृद्ध बनवेल असा विश्वास पाणी फाऊंडेशन टीमचे संतोष शिनगारे, कैलास पन्हाळकर, झुंबर पिंपळकर, शिवलेश्वर मेदणे, प्रवीण काथवठे, नितीन पाटोळे, महेश गुळभिले यांनी व्यक्त केला.
===Photopath===
140321\img-20210314-wa0184_14.jpg~140321\img-20210314-wa0187_14.jpg
===Caption===
धारूर तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या कामांमुळे सहभागी गावे समृद्ध होत असून व्हरकटवाडी परिसरातील छायाचित्र