७८७ कोरोनामुक्त, तर ७०० नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:53+5:302021-05-29T04:25:53+5:30
बीड : जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार कोरोनाचे ७०० नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ८४ हजार ...
बीड : जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार कोरोनाचे ७०० नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ८४ हजार ९६५ झाली असून, यापैकी ७७ हजार ७२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील २४ तासांत ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत एकूण १९५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ७८७ रुग्ण कोरोनामुक्त झालेले असून, त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी ६ हजार ६६९ संशयितांच्या कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. यात, ७०० नवे रुग्ण आढळले, तर ५ हजार ९६९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ३९, आष्टी ५६, बीड २५१, धारुर २१, गेवराई ८३, केज ६४, माजलगाव ४६, परळी १४, पाटोदा ४८, शिरुर ५५ आणि वडवणी तालुक्यातील २३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत बीड तालुक्यात आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा चिंताजनक आहेे. दरम्यान, मागील २४ तासांत ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ८४ हजार ९६५ इतकी झाली असून, पैकी ७७ हजार ७२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १९५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६ हजार रुग्ण ॲक्टिव्ह असल्याचे सूत्रांनी सांगितले.
------
जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख २० हजार ९२२ संशयितांची तपासणी केली असून, ४ लाख ३५ हजार ९५७ नमुने निगेटिव्ह आढळले, तर ८४ हजार ९६५ नमुने पॉझिटिव्ह आले. २८ मे रोजी जिल्ह्याचा मृत्युदर २.२९ टक्के होता.
-------
साडेतीन लाखांवर लसीकरण
जिल्ह्यात ८ हजार ६६७ नागरिकांचे लसीकरण शुक्रवारी करण्यात आले. आतापर्यंत ३ लाख ६७ हजार ५०२ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे.
-----------