दिंद्रुड ग्रामपंचायत निवडणुकीत ७९ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:29+5:302021-01-16T04:38:29+5:30
दिंद्रुड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. शुक्रवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत वाॅर्ड क्रमांक एकमध्ये ९७५ ...
दिंद्रुड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.
शुक्रवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत वाॅर्ड क्रमांक एकमध्ये ९७५ पैकी ७५२, वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये ९५६ पैकी ८१०, वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये ९८१ पैकी ७१३, वाॅर्ड क्रमांक चारमध्ये १०१८ पैकी ८३०, तर वाॅर्ड क्रमांक पाचमध्ये ९८१ पैकी ७८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दिंद्रुड येथे पाच वाॅर्डात एकूण ४९११ मतदान आहे. त्यापैकी ३८८४ महिला-पुरुषांनी मतदानाचा अधिकार बजावला. मात्र, काही वाॅर्डाची रचना चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला. मतदान केंद्र अंतराने मतदारांच्या जवळ असावे असे संकेत असताना वाॅर्ड क्र.२ मधील मतदारांना मतदानासाठी दूर जावे लागल्याने महिलांना त्रास झाला.
दिंद्रुडला १०५ वर्षाच्या आजीबाईंनी बजावला मताधिकार
१०५ वर्ष वयाच्या आजीबाईंनी मतदानाचा अधिकार बजावत सर्व तरुणाईसमोर नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.
मथुराबाई बेलाप्पा शेटे या आजीबाई आतापर्यंत लोकसभा, विधानसभा, जि.प., पं.स., ग्रामपंचायत, आदी निवडणुकींसाठी मतदानाचा न विसरता अधिकार बजावल्याचे सांगतात. पूर्व मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या मथुराबाई शेटे आजी असून आजघडीला त्यांचे वय १०५ च्या आसपास आहे. त्यांना व्यवस्थित चालताही येत नाही; परंतु स्मरणशक्ती चांगली असल्याने व गावातील सर्वांच्या भेटी मतदानादिवशी होत असल्याने मी न चुकता मतदानास उपस्थित राहते, असेही त्या सांगतात. मतदान करण्यासाठी आळस करणाऱ्यांसाठी मथुराबाई प्रेरणा देऊन जातात.