डीसीसीच्या ५७ शाखांमधून रोज ८ कोटींचे रोख वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:28 AM2019-05-18T00:28:33+5:302019-05-18T00:30:04+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासदांची गर्दी होत असून, बँकेच्या ५७ शाखांमार्फत दररोज ७ ते ८ कोटी रुपये रोख स्वरुपात वितरीत केले जात आहेत.

8 crores cash distribution through DCC 57 branches every day | डीसीसीच्या ५७ शाखांमधून रोज ८ कोटींचे रोख वितरण

डीसीसीच्या ५७ शाखांमधून रोज ८ कोटींचे रोख वितरण

Next
ठळक मुद्देशेतकरी सभासदांची गर्दी : दुष्काळी अनुदानाचे रोख स्वरुपात शाखेमार्फत वितरण; विम्याची रक्कम थेट खात्यात

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासदांची गर्दी होत असून, बँकेच्या ५७ शाखांमार्फत दररोज ७ ते ८ कोटी रुपये रोख स्वरुपात वितरीत केले जात आहेत. तसेच अनुदान आणि पीक विमा एकाही सभासदाच्या कर्ज खात्यात वर्ग केलेले नाही, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी दिली.
खरीप हंगाम २०१८ मध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला, यात बीड जिल्ह्याचा समावेश आहे. शासनाने दुष्काळी योजना लागू केल्या, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४२८ कोटींचे दुष्काळी अनुदान मंजूर झाले आहे. शासनामार्फत हे अनुदान दोन ते तीन टप्प्यात आले असून, दोन किंवा तीन टप्प्यात दिल्यामुळे एका शेतकºयाचे दोन ते तीन याद्यांमध्ये नाव समाविष्ट आहे. मार्च २०१९ पासून टप्प्याटप्प्याने जवळपास ३७५ कोटी रुपये दुष्काळी अनुदान शासनाकडून बँकेच्या विविध शाखेत प्राप्त झाले असून, जिल्ह्यात ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांची संख्या आहे. दोन किंवा तीन टप्प्यात अनुदान प्राप्त झाल्यामुळे शेतकºयांची सभासद संख्या १२ ते १३ लाखांपर्यंत होत आहे.
बँकेमार्फत २७५ कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान प्रत्यक्ष रोख स्वरुपात शाखेमार्फत शेतकºयांना वितरीत केले आहे. तसेच अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकºयांना प्राप्त ६५ कोटींचे अनुदान जानेवारी ते मार्च दरम्यान प्राप्त झाले तेही वितरण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आॅनलाईन पद्धतीने पीक विमा हप्ता भरणा करण्यात आला होता. त्यामध्ये ज्या शेतकºयांनी जिल्हा बँकेचे बचतखाते क्रमांक दिले आहेत, त्या शेतकºयांच्या बचतखात्यावर उडीद, मूग, कापूस, तीळ, भुईमूग, तूर, बाजरी पिकांची नुकसान भरपाईची रक्कम ७० कोटी रुपये डीबीटीद्वारे जमा केली आहे. याचे जवळपास ५१ कोटी रुपयांचे रोख स्वरुपात वितरण बँकेने केल्याचे सारडा यांनी सांगितले. जिल्ह्यात पर्जन्यमान कमी असल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांना मिळणारे अतिवृष्टी अनुदान, दुष्काळी अनुदान, पीक विमा नुकसान भरपाईच्या रकमा त्वरित वाटप करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित रकमा देखील त्वरित वाटप करण्याचे नियोजन करीत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये शेतकरी सभासदांची गर्दी होत आहे. काही शाखांमध्ये शाखाधिकारी, रोखपाल हे दोनच कर्र्मचारी आहेत. उपलब्ध शाखाधिकारी, कर्मचाºयांच्या माध्यमातूनच दुष्काळी अनुदान, पीक विमा नुकसान भरपाई, विविध अनुदान, अतिवृष्टीच्या रकमा खात्यावर जमा करण्यात आल्याचे सारडा म्हणाले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष गोरख धुमाळ, वसंत सानप, महादेव तोंडे, हिंदूलाल काकडे, परमेश्वर उजगरे, राडकर आदी संचालक उपस्थित होते.
२० टक्के शेतकºयांचेच १५ अंकी बचतखाते बरोबर
शासनाकडून बँकेकडे आलेले अनुदान जमा करण्यासाठी शेतकरी सभासदांच्या १५ अंकी खाते क्रमांकाची आवश्यकता असताना देखील प्राप्त अनुदान याद्यावर फक्त २० टक्के शेतकºयांचेच १५ अंकी बचतखाते क्रमांक बरोबर दिलेले आहेत.
असे असतानाही तहसील कार्यालयातून आलेल्या दुष्काळी अनुदान याद्या शाखेने स्वीकारुन ज्या शेतकºयांच्या नावाने अनुदान आले, त्या शेतकºयांचे खाते क्रमांक शोधून त्यांच्या बँकेतील बचतखात्यावर दुष्काळी अनुदानाच्या संपूर्ण रकमा जमा करण्यात आल्याचे बँक अध्यक्ष सारडा यांनी सांगितले.

Web Title: 8 crores cash distribution through DCC 57 branches every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.