महिलांना नव्हे, प्रसूतीसाठी १४ पैकी ८ रुग्णालयांनाच 'कळा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:42+5:302021-08-27T04:36:42+5:30

बीड : जिल्ह्यात ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय अशा १४ आरोग्य संस्था आहेत. येथील शिपाई ते डॉक्टर यांच्या वेतनासह ...

8 out of 14 hospitals for 'delivery', not for women | महिलांना नव्हे, प्रसूतीसाठी १४ पैकी ८ रुग्णालयांनाच 'कळा'

महिलांना नव्हे, प्रसूतीसाठी १४ पैकी ८ रुग्णालयांनाच 'कळा'

Next

बीड : जिल्ह्यात ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय अशा १४ आरोग्य संस्था आहेत. येथील शिपाई ते डॉक्टर यांच्या वेतनासह इमारत दुरुस्ती, बांधकाम व इतर सुविधांवर वर्षाला करोडोंची उधळपट्टी केली जाते; परंतु मागील तीन महिन्यांत १४ पैकी ८ आरोग्य संस्थांची प्रसूती संख्या खूपच कमी आहे. ग्रामीण रुग्णालयांनाच महिलांची प्रसूती करण्यास 'कळा' येत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह केज, गेवराई, परळी येथे उपजिल्हा, तर धानोरा, आष्टी, धारूर, नांदूरघाट, माजलगाव, तालखेड, पाटोदा, रायमोहा, चिंचवण येथे ग्रामीण रुग्णालये आहेत. नेकनूरमध्ये स्त्री रुग्णालय कार्यान्वित आहे. सर्वच ठिकाणी नियमाप्रमाणे सर्जन, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी अशी पदे आहेत. परळी, नेकनूरमध्ये भूलतज्ज्ञ आणि गेवराईत फिजिशियन वगळता इतर सर्वच ठिकाणी ही पदे भरलेली आहेत. यांच्या वेतनावर महिन्याकाठी करोडो रुपये खर्च केले जातात; परंतु या तज्ज्ञांच्या तुलनेत सामान्यांना सेवा अतिशय कमी मिळत असल्याचे समोर आले आहे. अपवादात्मक वगळता सर्वच नियुक्त डॉक्टर हे सरकारी रुग्णालयाला वाऱ्यावर सोडून खाजगी रुग्णालयात ठाण मांडत असल्याचे उघड झालेले आहे. यामुळेच सरकारी रुग्णालयातील प्रसूतीचा आकडा खासगीच्या बरोबरीने असल्याचे समोर आले आहे. यात सुधारणा करण्यासाठी सर्वच डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना नेमून दिलेले काम आणि कर्तव्याच्या वेळेत रुग्णालयात थांबवण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सरकारी सोडून खासगी सेवा देणाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे.

...

सीएसकडून तालखेड, चिंचवणचे 'स्टिंग'

प्रसूतीसह ओपीडीचा आकडा पाहता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी चिंचवण व तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयाचे स्टिंग ऑपरेशन केले. यात त्यांना डॉक्टर, कर्मचारी गैरहजर आढळले. या सर्वांवर वेतन कपातीची कारवाई त्यांनी तत्काळ केली होती. त्यामुळे काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. ती कायम राहावी, अशी मागणी होत आहे.

...

केवळ पाच संस्थेत सिझर; खासगीत ४३

जिल्हा रुग्णालयासह नेकनूर, गेवराई, केज, परळी या पाच संस्थेत सिझर झालेले आहेत. इतर सर्वच ठिकाणचा आकडा शून्य आहे. जिल्ह्यातील १४ संस्थेत १९, तर खासगीतील सिझरचा आकडा तब्बल ४३ आहे. स्वाराती अंबाजोगाईचा आकडाही तेवढाच आहे.

--

तालखेड, चिंचवण ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन गैरहजर डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीचा आकडा वाढला आहे. आता इतर संस्थेतही ओपीडी आणि प्रसूतीचा टक्का वाढविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. हलगर्जी करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही.

-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.

---

आकडेवारीनुसार हा घ्या पुरावा..

एप्रिल ते जून २०२१

आरोग्य संस्थानॉर्मल प्रसूती महिना सरासरीसिझर

बीड १२७१ ४२४ ६७

नेकनूर १७९ ६० २४

गेवराई २०६ ६९ ९

केज ३७३ १२४ ९४

परळी ३०० १०० ५१

धानोरा ११ ४ ०

आष्टी ३१ ४ ०

धारूर ७५ २५ ०

नांदूरघाट ७ २ ०

माजलगाव १७३ ५८ ०

तालखेड ४ १ ०

पाटोदा २३ ८ ०

रायमोहा २८ ९ ०

चिंचवण ५ २ ०

एकूण २६८६ ८९५ १९

260821\26_2_bed_14_26082021_14.jpg

डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

Web Title: 8 out of 14 hospitals for 'delivery', not for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.