२४ तासांत ८ रुग्णांचा मृत्यू; कोरोनाचे ६०३ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:24+5:302021-05-28T04:25:24+5:30
बीड : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ६०३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ८४ हजार २०० झाली ...
बीड : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ६०३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ८४ हजार २०० झाली असून यापैकी ७६ हजार ९०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, मागील २४ तासांत ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १९३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारनंतर गुरुवारीदेखील आढळलेल्या नवे कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे.
जिल्ह्यात गुरुवारी ५ हजार ५८८ संशयितांच्या कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. यात, ६०३ नवे रुग्ण आढळले तर, ४ हजार ९८५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ५५, आष्टी ७९, बीड १६५, धारुर ३०, गेवराई ५८, केज ६५, माजलगाव ५०, परळी १२, पाटोदा २६, शिरुर ४९ आणि वडवणी तालुक्यातील १४ जणांचा समावेश आहे. दरम्यान, मागील २४ तासांत ८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ८४ हजार २०० इतकी झाली असून पैकी ७६ हजार ९०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १९३३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५ हजार ३८७ रुग्ण ॲक्टिव्ह असल्याचे सूत्रांनी सांगितले.
------
मागील तीन दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत होणारी काही प्रमाणातील घट समाधानकारक असली तरी गाफीलपणा नको, असे सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन, आवश्यक तेथे कोरोना चाचण्या, त्वरित उपचाराबाबत हलगर्जीपणा न करता कोरोनाशी लढावे लागणार आहे.
------