बीडमध्ये माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवकासह ८ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:33 AM2019-05-28T00:33:39+5:302019-05-28T00:34:11+5:30

जुन्या भांडणाच्या वादातून एका ४० वर्षीय व्यापाऱ्यावर आठ जणांनी जिवघेणा हल्ला केला. ही घटना २२ मे रोजी जिल्हा रूग्णालयात घडली होती. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात माजी उपनगराध्यक्षांसह नगरसेवक व इतर ८ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे.

8 people including former vice-president, corporator in Beed | बीडमध्ये माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवकासह ८ जणांवर गुन्हा

बीडमध्ये माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवकासह ८ जणांवर गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जुन्या भांडणाच्या वादातून एका ४० वर्षीय व्यापाऱ्यावर आठ जणांनी जिवघेणा हल्ला केला. ही घटना २२ मे रोजी जिल्हा रूग्णालयात घडली होती. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात माजी उपनगराध्यक्षांसह नगरसेवक व इतर ८ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सय्यद अमानउल्ला सय्यद रजाउल्ला (वय ४०, व्यवसाय व्यापार, झमझम कॉलनी) असे मारहाण झालेल्या व्यापा-याचे नाव आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार माजी उपनगराध्यक्ष सय्यद फारुक अली मुसल अली, नगरसेवक शेख अशफाक इनामदार यांच्यासह नवाज खान बिस्मिल्ला खान, सय्यद फसदउल्ला सय्यद सुजदउल्ला, सय्यद मुजाहेद अली स. नुसरत अली, शेख आवेज इनामदार, नसीम खान, अजगर खान यांचा आरोपींत समावेश आहे.
२२ मे रोजी बशीरगंज भागात एकमेकांकडे टक लावून पाहिल्याने हा वाद उफाळून आला होता. त्यानंतर शहर ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. त्याच रात्री साडेदहा वाजता सय्यद अमानउल्ला सय्यद रजाउल्ला हे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. वॉर्ड क्र.५ मध्ये ते उपचार घेत असताना तेथे आठ जण आले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आठ लोक लोखंडी गज, काठ्या, फायटर घेऊन तेथे आले आणि मारहाण करू लागले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, यातील काही नावे हे अंतर्गत वादातून गोवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात हे लोक घटनास्थळी भांडणे सोडविण्यासाठी आल्याचे सांंगण्यात आले. मात्र, जखमीने जबाबात ही सर्व नावे घेतल्याने गुन्हा नोंदविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पाठलाग करून दोघे गजाआड : सहा आरोपी अद्यापही फरार
गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण आरोपींना लागली. ते लगेच बीड शहरातून फरार होत होते.
रात्रीच्या सुमारास ते मांजरसुंबा मार्ग एका जीपमधून फरार होत होते. याचवेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.
माजी उपनगराध्यक्ष सय्यद फारुक अली मुसल अली, नगरसेवक शेख अशफाक इनामदार या दोघांना बेड्या ठोकल्या. अद्यापही सहा आरोपी फरार आहेत.

Web Title: 8 people including former vice-president, corporator in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.