८० लाख द्या, नीटमध्ये ६५० पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ; दलालाचा अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस फोन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 08:47 AM2024-06-28T08:47:44+5:302024-06-28T08:47:52+5:30

अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते  तारेखअली उस्मानी यांची मुलगी हैदराबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेते.

80 Lakhs, get more than 650 marks in NEET A broker's phone call to a female student in Ambajogai  | ८० लाख द्या, नीटमध्ये ६५० पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ; दलालाचा अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस फोन 

८० लाख द्या, नीटमध्ये ६५० पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ; दलालाचा अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस फोन 

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क, अंबाजोगाई (जि. बीड) : तुला नीट परीक्षेत ६५० पेक्षा जास्त गुण मिळतील. तुझा चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागेल. मात्र, यासाठी तुला ८० लाख रुपये द्यावे लागतील, असा फोन सलग दोन वेळा अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस दलालामार्फत आला होता. हा प्रकार त्या मुलीने नीट परीक्षेतील पेपर फुटीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर आपल्या पालकांना सांगितला. अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते  तारेखअली उस्मानी यांची मुलगी हैदराबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेते. ती यावर्षी नीट परीक्षेसाठी बसली होती. याच कालावधीत परीक्षेपूर्वी तिला एका दलालाचा फोन आला. 

‘तुला आम्ही नीट परीक्षेत ६५० पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ,  तुझा चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागेल. अभ्यास करण्याची गरज नाही. आम्ही परीक्षा केंद्रांसह सर्व काही मॅनेज  करतो. मात्र, यासाठी तुला ८० लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील,’ असे दलालाने सांगितले. परंतु,  त्या विद्यार्थिनीने काहीही प्रतिसाद दिला नाही. परत दलालाचा फोन आला. तरीही तिने या गोष्टीस नकार दिला. जेव्हा नीट परीक्षेतील सावळा गोंधळ सुरू झाला, त्यावेळी ही बाब त्या मुलीने आपल्या वडिलांना सांगितली. अशा प्रकारचे आमिष अंबाजोगाईतील आणखी दोन ते तीन पालकांनाही दाखविण्यात आले असल्याचे समोर आले आहे. मात्र, नको ती भानगड, यामुळे अनेक पालकांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

Web Title: 80 Lakhs, get more than 650 marks in NEET A broker's phone call to a female student in Ambajogai 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.