मराठी साहित्यातील ८० टक्के पुस्तके रद्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:11 PM2017-12-25T23:11:26+5:302017-12-25T23:12:41+5:30

केवळ भावनाप्रधान लिखाण करून आत्मप्रौढीसाठी केल्या जाणाºया मराठी साहित्याला तात्विक चिंतनाची बैठक आणि बौद्धिकतेचा गंध नाही. जगण्याचे कोणतेही संदर्भ नसणा-या या साहित्यातील ८० टक्के पुस्तके ही किलोने विक्री करण्यायोग्य असतात, अशी परखड टीका ज्येष्ठ कवी चंद्रकांत पाटील यांनी केली.

80 percent of books in Marathi literature junk! | मराठी साहित्यातील ८० टक्के पुस्तके रद्दी!

मराठी साहित्यातील ८० टक्के पुस्तके रद्दी!

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांनी घेतला लिखाणातील दांभिकपणा आणि साहित्यकारांचा समाचार

मयूर देवकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : केवळ भावनाप्रधान लिखाण करून आत्मप्रौढीसाठी केल्या जाणाºया मराठी साहित्याला तात्विक चिंतनाची बैठक आणि बौद्धिकतेचा गंध नाही. जगण्याचे कोणतेही संदर्भ नसणा-या या साहित्यातील ८० टक्के पुस्तके ही किलोने विक्री करण्यायोग्य असतात, अशी परखड टीका ज्येष्ठ कवी चंद्रकांत पाटील यांनी केली. ३९व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या दुसºया दिवशी सोमवारी (दि.२५) पहिल्या सत्रात चंद्रकांत पाटील यांची रणधीर शिंदे, आसाराम लोमटे आणि तुषार बोडखे यांनी प्रकट मुलाखत घेतली.

याप्रसंगी त्यांनी मराठी साहित्याची दशा, कवितांची अवस्था, लेखकांची नैतकिता, समीक्षेचा उथळपण यांचा सडेतोड शब्दांत समाचार घेतला. आजचे लेखक तटस्थ आणि गंभीर समिक्षेविषयी फारसे उत्सुक नसतात याविषयी बोलताना ते म्हणाले की, आजचे जग हे जाहिरातीचे झाले आहे. तुमची जाहिरात झाली नाही तर तुम्हाला कोणी ओळखत नाही. त्यामुळे आजकाल साहित्यिक वर्तमान पत्र आणि टीव्ही चॅनेलवर येण्यासाठी धडपड करताना दिसतात. उत्तम साहित्यनिर्मितीपेक्षा आपण चर्चेत कसे राहणार यावर त्यांचा भर असतो.

कवितेची समीक्षा करतान ते म्हणाले की, आजकाल सर्वांना कवि व्हायचेय, पण कविता कोणी करू इच्छित नाही. त्यामध्ये ना चिंतन, ना अधिभौतिक विचारांचा ऊहापोह. केवळ भावनेच्या पातळीवर तक्रारीला दु:खाची झालार चढवून अत्यंत उथळ पातळीवर काव्यनिर्मिती मराठी होतेय. ज्याला कवितेची भाषा कळत नाही त्यालादेखील मोठे मोठे वाङ्मय पुरस्कार दिले जातात. भाषेबद्दल एवढी उदासिनता खेदजनक आहे.

अनुवादापेक्षा मूळ साहित्य श्रेष्ठच
ज्या भाषेत जे नाही ते इतर भाषेतून अनुवादाच्या माध्यमातून आणले पाहिजे. दोन संस्कृतींना जोडण्याचे काम अनुवाद करतो. त्यामुळे सांस्कृृतिक पातळीवर जरी अनुवाद महत्त्वाचा असला तरी मूळ सृजनशीलतेच्या तुलनेत तो दुय्यमच असतो. मूळ साहित्य कधीही श्रेष्ठच.

लघुनियतकालिक चळवळीचे यशापयश
प्रस्थापित व्यवस्थेला हादरा देण्याचे, व्यवस्थेने नाकारलेल्या विचारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे विद्रोही काम लघुनियतकालिकांनी केले. अशोक शहाणे यांनी अनेक लेखकांसाठी साहित्याची दारे खुली केली. परंतु कोणतीही चळवळ ४० टक्केच यशस्वी होऊ शकते. मराठी साहित्यची मूलभूत चिकित्सा करण्यात ते कमी पडले. आजच्या पीढीने नवीन मुद्दे घेऊन विद्रोह करावा. मात्र, आजच्या विद्यार्थ्यांना नवा विचारच नाही. त्यांचा विवेक हरवला आहे, ही शोकांतिका आहे.

आत्मचरित्र म्हणजे दांभिकपणाची गोष्ट
तुमच्या जीवनकाहाणीतून सांस्कृतिक समृद्धी होत असेल, नवा विचार समोर येत असेल तर च आत्मचरित्र लिहावे. अन्यथा आत्मसमर्थनात धन्यता मानणारे आत्मचरित्र म्हणजे दांभिकपणाची गोष्ट आहे. आत्मचरित्रामध्ये तुमच्या यशापेक्ष तुमच्या अपयशाची चर्चा असावी. तुम्ही कोठे कमी पडला याविषयी लिहावे.

Web Title: 80 percent of books in Marathi literature junk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.