८० वर्षाच्या आजोबांचा प्रताप; तुरीच्या शेतात केली गांजाची लागवड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:04 PM2024-11-06T13:04:53+5:302024-11-06T13:05:35+5:30

अंभोरा पोलिसांकडून शेतात धाड टाकून मुद्देमाल जप्त

80 year old grandfather Cultivatite of cannabis in Tur crops in his own field | ८० वर्षाच्या आजोबांचा प्रताप; तुरीच्या शेतात केली गांजाची लागवड

८० वर्षाच्या आजोबांचा प्रताप; तुरीच्या शेतात केली गांजाची लागवड

- नितीन कांबळे
कडा-
घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तुरीच्या शेतात गाजांची लागवड केल्याची गोपनीय माहिती कळताच अंभोरा पोलिसांनी लवाजम्यासह धाड टाकून कारवाई केली आहे. ८० वर्ष वयाच्या आजोबांनी हा प्रताप केल्याचे समोर आले आले असून त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आही. रामदास देवराव खरसे ( रा.वाहिरा ता.आष्टी) असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान केली.

आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे ८० वर्ष वय असलेल्या रामदास देवराव खरसे आजोबांनी तुरीच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांना मिळाली. यावरून ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान त्यांनी पथकासह वाहिरा येथील शेतात धाड टाकली. येथे तुरीच्या पिकत तीन किलो वजनाचे गांजाची झाडे आढळून आली. एकूण  ५७ हजार २०० रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे,पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, सतिश पैठणे,सुदाम पोकळे,मनोज खंडागळे,वाहन चालक पवार यांनी केली.आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.तहसीलदार वैशाली पाटील याच्यावर महसुलच्या कर्मचाऱ्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.

 

Web Title: 80 year old grandfather Cultivatite of cannabis in Tur crops in his own field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.