ऑक्सिजन सिलिंडरसाठी ग्रामसेवक युनियनकडून ८० हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:34 AM2021-05-09T04:34:44+5:302021-05-09T04:34:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोना आपत्ती निवारण करण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा ग्रामसेवक युनियनकडून ८० ...

80,000 assistance from Gramsevak Union for oxygen cylinder | ऑक्सिजन सिलिंडरसाठी ग्रामसेवक युनियनकडून ८० हजारांची मदत

ऑक्सिजन सिलिंडरसाठी ग्रामसेवक युनियनकडून ८० हजारांची मदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोना आपत्ती निवारण करण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा ग्रामसेवक युनियनकडून ८० हजार रूपयांची आर्थिक मदत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

दिनांक ७ मे रोजी ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, दत्तात्रय गिरी, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे, सरचिटणीस भगवानराव तिडके, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके, बीड तालुकाध्यक्ष सखाराम काशीद, तालुका सचिव भाऊसाहेब मिसाळ तसेच अशोक मिसाळ, मनोज डांगे, धनराज सोनवणे, आदी उपस्थित होते. यावेळी कोविड परिस्थितीत सुरू असलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी रमेश उनवणे, ओम चोपणे, प्रवीण तेलप, कैलास घोडके, रामेश्वर जाधव, बी. बी. झोबांडे, दिनकर सानप, वसंत मुने, डी. व्ही. बिराजदार, नारायण सपकाळ, रामप्रभू वाघुले, विजयकुमार मस्के, बाबासाहेब कुडके, लिंबाजी सोनवणे, रवी घोडके, आदी ग्रामसेवक उपस्थित होते.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी कोविड हॉस्पिटल

ग्रामसेवक युनियनतर्फे मदतनिधी सुपूर्द केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी कोविड-१९ उपचार व निदान करण्यासाठी १०० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी आपत्कालिन मदत, राखीव बेड व रेमडेसिविर, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व्यवस्था करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या निर्णयाचे बीड जिल्हा ग्रामसेवक युनियनकडून स्वागत करण्यात आले. त्यासाठी ग्रामसेवक व सर्व कर्मचारी एक दिवसाचा पगार देणार असल्याचे ग्रामसेवक युनियनतर्फे बळीराम उबाळे व भगवानराव तिडके यांनी सांगितले.

Web Title: 80,000 assistance from Gramsevak Union for oxygen cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.