परळीत ८३.६४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:27+5:302021-01-16T04:38:27+5:30
परळी : तालुक्यातील मोहा, सरफराजपूर, लाडझरी, भोपला, रेवली, गडदेवाडी या ६ ग्रामपंचायतींच्या ४२ जागांसाठी शुक्रवारी शांततेत ८३.६४ ...
परळी : तालुक्यातील मोहा, सरफराजपूर, लाडझरी, भोपला, रेवली, गडदेवाडी या ६ ग्रामपंचायतींच्या ४२ जागांसाठी शुक्रवारी शांततेत ८३.६४ टक्के मतदान झाले. सहा ग्रामपंचायतींसाठी ५ हजार ९९२ मतदारांनी आपला हक्क बजावला. मोहा ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी २५ उमेदवार, गडदेवाडीतील ७ जागांसाठी १५, सरफराजपूरमध्ये ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात असून, रेवलीत ९ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित एका जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. भोपला येथे ७ जागांसाठी १४, लाडझरीत ९ जागांसाठी २२ उमेदवारांमध्ये लढत झाली. तालुक्यातील सर्फराजपूर येथे सर्वात जास्त ९४.९३ टक्के मतदान झाले तर भोपळा येथे ९१.३२ टक्के, गर्देवाडी येथे ९१.२८ टक्के, लाडझरी येथे ८३.४८ टक्के, मोहा येथे ८२.३३ टक्के तर रेवली येथे सर्वात कमी ६४.९१ टक्के मतदान झाले. सहा गावांमध्ये एकूण १७ मतदान केंद्र स्थापित केली होती. मतदान केंद्र अधिकारी, कर्मचारी, पोलीस असे १०२पेक्षा जास्त कर्मचारी व चार झोनल अधिकाऱ्यांची या निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.