३५ हेक्टर क्षेत्रावर ८६ हजार झाडे लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:33+5:302021-06-11T04:23:33+5:30
कडा : दरवर्षी वन विभागाकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जात असली तरी जोपासना होताना दिसत नाही. झाडे ...
कडा : दरवर्षी वन विभागाकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जात असली तरी जोपासना होताना दिसत नाही. झाडे जगवताना अनंत अडचणी येत असतानाही आता यंदाच्या पावसाळ्यात ३५ हेक्टर क्षेत्रावर वन विभागाकडून ८६ हजार झाडे लावण्यात येणार असून त्याची पूर्वतयारी वन विभागाने केली आहे. यासाठी खड्डे खोदून तयार आहेत. मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्याचे आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी लोकमतला सांगितले.
आष्टी तालुक्यात एकीकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जात असली तरी दुसरीकडे मोठमोठी वृक्षतोड होत असल्याने लावलेली झाडे जगवताना मोठी कसरत करावी लागत असली तरी तोड काही कमी होताना दिसत नाही. वन विभाग सतर्क असला तरी चोरून लपून तोड कायमच चालू आहे. तर पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी झाडे लावण्यासाठी खड्डे खोदून तयार आहेत. झाडे लावण्या योग्य पाऊस पडताच हे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार असल्याचे शिरसाठ म्हणाले.
===Photopath===
100621\nitin kmble_img-20210604-wa0029_14.jpg