Beed: ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मोठा फटका; एकाच रात्रीतून ९ कृषी पंपाची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:49 IST2025-03-18T18:46:10+5:302025-03-18T18:49:25+5:30
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Beed: ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मोठा फटका; एकाच रात्रीतून ९ कृषी पंपाची चोरी
- मधुकर सिरसट
केज ( बीड) : तालुक्यातील हदगाव शिवारातील बोभाटी नदी शेजारी असलेल्या चार शेतांमधून 1 लाख 4 हजार रुपये किमतीचे एकूण आठ पाणबुडी कृषिपंप चोरटयांनी लंपास केले. ही घटना गुरुवारी (दि.13) रात्री घडली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील हदगाव येथील महादेव शिवाजी वायबसे (45) रा. हदगाव या शेतकऱ्याच्या शेतातील 30 हजार रुपये किमतीचे दोन पाणबुडी कृषिपंप, अमोल यादव या शेतकऱ्याच्या 39 हजार रुपये किमतीचे तीन पाणबुडी कृषिपंप व हनुमान चांगदेव हांगे या शेतकऱ्याचा 25 हजार रुपयाचा एक कृषिपंप, बाबासाहेब महादेव वायबसे यांचा 10 हजार रुपये किमतीचा एक पाणबुडी कृषिपंप असे, एकूण 1 लाख, 4 हजार रुपये किंमतीचे एकूण आठ कृषी पंप चोरटयांनी लंपास केले. महादेव शिवाजी वायबसे यांनी सोमवारी (दि.17) दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली जमादार बाबासाहेब बांगर हे करीत आहेत.
खंडू भांगेच्या कृषी पंपाचीही चोरी..!
हदगाव येथील खंडू जिवराज भांगे या शेतकऱ्याच्या मालकीच्याही 18 हजार रुपये किमतीच्या एका कृषी पंपाची चोरी याच रात्री झाली आसून त्यांच्याकडे कृषिपंप खरेदीची पावती न सापडल्या मुळे त्यांची फिर्याद पोलिसांनी नोंद करुन घेतली नसल्याची माहिती खंडू भांगे यांनी लोकमतशी बोलताना दिली.