९ गावांतील लोकांचे पाण्यासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:29 AM2019-03-03T00:29:02+5:302019-03-03T00:29:33+5:30
गेवराई तालुक्यातील कोलतेवाडी जवळ असलेल्या सीआर क्र. ८६ या कालव्याच्या परिसरात जवळपास ९ गावांतील लोक उपोषणाला बसले आहेत.
तलवाडा : गेवराई तालुक्यातील कोलतेवाडी जवळ असलेल्या सीआर क्र. ८६ या कालव्याच्या परिसरात जवळपास ९ गावांतील लोक उपोषणाला बसले आहेत.
गोदापात्र आटल्याने जनावरांसह माणसांचे हाल होत असल्याने गोदावरी नदीवरील मंगरु ळ बंधाऱ्यात पाणी सोडावे या मागणीसाठी कोलतेवाडी येथील सी.आर.क्र . ८६ येथे नऊ गावांतील लोक उपोषणाला बसले आहेत. गोदावरी नदीवरील सर्व बंधाऱ्यात पाणी भरलेले असूनही मंगरूळ बंधारा हा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे.
या बंधाºयात पाणी सोडून या परिसरातील ग्रामस्थांना दुष्काळी परिस्थितीत दिलासा द्यावा, त्यांची पाण्यासाठी होणारी फरपट थांबवावी, या मागणीसाठी गंगावाडी, मंगरु ळ, राजापूर, राहेरी, भोगगाव, तलवाडा, जवळा, बाणेगाव, काठोडा या गावांतील जवळपास २०० लोकांनी शनिवारी सकाळपासून उपोषण सुरु केले. उपोषणस्थळी माजी आ. अमरसिंह पंडित, अॅड.सुरेश हात्ते यांनी भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
बंधा-यात येणारे पाणी हे पूर्ण क्षमतेने सोडले जाते. मात्र, ते जायकवाडीतून मोजून दिले जाते. प्रत्यक्षात बंधाºयात पोहोचेपर्यंत निम्म्यापेक्षाही अधिक पाणी वाया व चोरी होऊन पाणी कमी येते. त्यामुळे हक्काचे पाणी मिळावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.