एकाच दिवशी तपासली २०८९ शौचालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:17 AM2019-11-18T00:17:38+5:302019-11-18T00:18:31+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत आष्टी तालुक्यातील शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांच्या अनुदानासंदर्भात तक्रार आल्यानंतर एकाच दिवशी ७ गावातील २०८९ लाभार्थी आणि त्यांनी बांधलेले शौचालय तसेच अनुदानाबाबत चौकशी केली असून अहवाल अंतिम टप्प्यात आहे.

90 toilets checked in one day | एकाच दिवशी तपासली २०८९ शौचालये

एकाच दिवशी तपासली २०८९ शौचालये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत आष्टी तालुक्यातील शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांच्या अनुदानासंदर्भात तक्रार आल्यानंतर एकाच दिवशी ७ गावातील २०८९ लाभार्थी आणि त्यांनी बांधलेले शौचालय तसेच अनुदानाबाबत चौकशी केली असून अहवाल अंतिम टप्प्यात आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
आष्टी तालुक्यातील क-हेवडगाव येथील राम सूर्यभान खाडे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारीत १ मार्च २०१८ ते ३० जुलै २०१९ या कालावधीमध्ये आष्टी येथील गटविकास अधिका-यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) मधील शौचालय बांधकामाचे अनुदान गेवराई तालुक्यातील मल्टीस्टेट अर्बन बॅँकेमार्फत वितरण केल्याने चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार उपायुक्त विकास सूर्यकांत हजारे यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला होता.
या प्रकरणी चौकशी समिती नेमून चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले होते. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी या समितीचे प्रमुख होते तर स्वच्छता आणि पाणी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे आदींचा या समितीमध्ये समावेश होता. ६९ कर्मचाºयांची ७ पथके सात गावांतील तक्रारींच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आली. यात पंचायतचे विस्तार अधिकारी पथक प्रमुख, स्वच्छ भारतचे तालुका समन्वयक, नरेगामधील तांत्रिक कर्मचा-यांचा समावेश होता.
अशी केली चौकशी
पथकाने गावातील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन अनुदान कशा पद्धतीने मिळाले याची चौकशी केली. १ मार्च २०१८ ते ३० जुलै २०१९ या कालावधीतील अनुदान वाटप व शौचालय बांधकामाची माहिती घेण्यात आली.
या मुद्यांवर चौकशी
कुटुंब प्रमुखाचे नाव, शौचालय बांधकाम आहे अथवा नाही, प्रोत्साहनपर अनुदान मिळाले अथवा नाही, किती निधी प्राप्त झाला? , अनुदान रोख, आरटीजीएस, धनादेश अथवा धनाकर्षद्वारे मिळाले, खात्यावर जमा झालेले अनुदान राष्टÑीयीकृत, सहकारी, पतसंस्था अथवा मल्टीस्टेटद्वारे कसे जमा झाले. राष्टÑीयीकृत बॅँकेत खाते नसल्यास किंवा तालुक्याबाहेर खाते असल्यास त्याचे कारण, स्वत: रक्कम काढली की दुस-याने उचलली? आदी मुद्यांवर ही चौकशी करण्यात आली.

Web Title: 90 toilets checked in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.