ऊर्ध्व कुंडलिका मध्य प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:23 AM2021-07-21T04:23:11+5:302021-07-21T04:23:11+5:30

राम लंगे वडवणी : ऊर्ध्व कुंडलिका धरणाची पाणी पातळी ५३६.१० मीटर झाली असून धरणातील उपयुक्त साठा ८४ टक्के इतका ...

90% water storage in Urdhva Kundalika Central Project | ऊर्ध्व कुंडलिका मध्य प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा

ऊर्ध्व कुंडलिका मध्य प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा

Next

राम लंगे

वडवणी : ऊर्ध्व कुंडलिका धरणाची पाणी पातळी ५३६.१० मीटर झाली असून धरणातील उपयुक्त साठा ८४ टक्के इतका झालेला आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा धरणाच्या ऊर्ध्व भागातील पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेनुसार धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्याच्या अनुषंगाने ठरविण्यात येणार आहे. कुंडलिका नदीकाठावरील शेतकरी, नदीकाठावर वस्ती करून राहिलेले नागरिक यांना सावधतेचा इशारा दिला असून जेणेकरून जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे.

तालुक्यात असलेल्या, वरदान ठरलेल्या ऊर्ध्व कुंडलिका धरणात गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. धरणात २० जुलै रोजी ९० टक्के पाणीसाठा असून पावसाचा जोर वाढत असल्यामुळे हे धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोणत्याहीक्षणी या धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना आणि नदीशेजारी वस्ती करून राहणाऱ्या लोकांना जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. वडवणी तालुका हा कायम दुष्काळाच्या खाईत असायचा. मात्र अप्पर ऊर्ध्व कुंडलिका धरणामुळे या तालुक्याचे नंदनवन झाले आहे .या प्रकल्पातील प्रकल्पीय पूर्ण साठा क्षमता १८.७७ द.श.घ.मी. असून जलाशयाची पूर्ण पाणी पातळी ५३७ मीटर आहे. या प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा १५.५७ असून २० जुलै रोजी या धरणात ५३६.४६ पाणीसाठा आहे.

तालुक्यातील जवळपास २ हजार ८०० हेक्टर शेती या धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली आल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते. २० जुलैला या धरणात ५३६.४५ मीटर इतका पाणीसाठा झाला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून या धरणात पाण्याची वेगाने वाढ होत असल्यामुळे येणारे पाणी हे कुंडलिका नदीपात्रात सोडावे लागणार आहे.

याबाबत बीड पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अजय गुजर म्हणाले की, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) अतिवृष्टी होण्याची शक्यता असून धरणात येणाऱ्या येव्यामुळे (Inflow) धरण निर्धारित पातळीत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर येणारा येवा कुंडलिका नदीपात्रात सोडावा लागणार आहे. धरणात येणारा येवा पाहता, आजच्या ५३६.४५ मीटर या पातळीनंतर येणाऱ्या येव्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे.

याबाबत तहसीलदार प्रकाश सिरसेवाड म्हणाले की, काल तलावाची पाहणी केली असून ते जवळपास ९० टक्के भरलेले आहेत. ९० टक्के धरणाची पातळी ५३६.४५ असून कधीही पाऊस पडला की धरणातून पाणी सोडले जाईल. नदीकाठावरील गावांतील नागरिकांना याबाबत कळविले आहे

200721\img-20210720-wa0023.jpg

ऊर्ध्व कुंडलिका मध्य प्रकल्पात 89.95% पाणीसाठा पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रकल्पाचे छायाचित्र

Web Title: 90% water storage in Urdhva Kundalika Central Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.