धारूरमध्ये ९ हजार ३०० रुपये दंड वसूल; एक दुकान केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:00+5:302021-05-23T04:33:00+5:30
: शहरात पोलीस व नगरपरिषदेच्या पथकाने शनिवारी लाॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली. उघडे असणारे एक दुकान सिल केले. तर ...
: शहरात पोलीस व नगरपरिषदेच्या पथकाने शनिवारी लाॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली. उघडे असणारे एक दुकान सिल केले. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ९ हजार ३०० रूपयांचा दंड वसूल केला.
धारूर शहरात पोलीस व नगरपरिषद पथकाने शनिवारी शिवाजी चौकात धडक मोहीम राबवली. येथील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या एक भांड्याचे दुकान या संयुक्त पथकाने सील करून या दुकानदाराकडून ३ हजार रुपये दंड वसूल केला. हे सील करण्यात आलेले या लाॕॅकडाऊनमधील पाचवे दुकान आहे. या कारवाईमुळे शहरात दुकाने उघडणारांनी धसका घेतला आहे. तर मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांडून शनिवारी ९ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. या मोहिमेत पोलीस निरीक्षक सुरेखा धस व पोलीस कर्मचारी व नगरपरिषदचे संतोष जुजगर, नितीन इजाते, शेख शोएब, सचिन डावकर, बजरंग शिनगारे, हरीश अवस्थी आदींनी या मोहिमेत भाग घेतला होता.