भूविकास बॅँकेतील बीडच्या ९४ कर्मचाऱ्यांचे साडेनऊ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:56 AM2019-01-24T00:56:06+5:302019-01-24T00:56:39+5:30

अवसायनात काढलेल्या भूविकास बॅँकेतील ९४ कर्मचा-यांचे जवळपास ९ कोटी ५० लाख रुपये थकले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने या कर्मचा-यांनी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे सामुहिक आत्महत्येची मागणी केली आहे.

9.5 crore of Beed's 94 employees in land development bank | भूविकास बॅँकेतील बीडच्या ९४ कर्मचाऱ्यांचे साडेनऊ कोटी थकले

भूविकास बॅँकेतील बीडच्या ९४ कर्मचाऱ्यांचे साडेनऊ कोटी थकले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अवसायनात काढलेल्या भूविकास बॅँकेतील ९४ कर्मचा-यांचे जवळपास ९ कोटी ५० लाख रुपये थकले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने या कर्मचा-यांनी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे सामुहिक आत्महत्येची मागणी केली आहे.
२४ जुलै २०१५ रोजी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन सर्व भू विकास बॅँक अवसायनात काढून बंद केल्या. कर्मचा-यांचे देणे भागविण्यासाठी राज्यातील बॅँकांच्या मालमत्ता विक्री करणे व हस्तांतरीत करण्यासाठी मंत्री गट समिती नियुक्त केली होती. बॅँकेची मालमत्ती विक्री करताना ई - टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे १९ नोव्हेंबर २०१७ रोजी उपसमितीने कर्मचा-यांची देणी अदा करण्यासाठी बाजारदरानुसार मूल्यांकन करुन भूविकास बॅँकेकडून येणे असणा-या रकमा समायोजित न करता सदरची रक्कम भूविकास बॅँक कर्मचा-यांची देणी अदा करण्यासाठी ती उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला होता. यासही एक वर्षाचा कालावधी होऊनही ठोस अंमलबजावणी झालेली नाही.
बीड जिल्हा भूविकास बॅँकेतील ९४ कर्मचा-यांची थकित पगार, ग्रॅच्युटी, रजेचा पगार व नुकसान भरपाई अशी एकूण ९ कोटी ५० लाख रुपये येणे आहे. ९४ पैकर १० ते १५ कर्मचारी मयत झाले असून त्यांच्या विधवा पत्नीकडे उपजीविकेसाठी कुठलेही साधन नसल्याने मोलमजुरी करुन आपल्या पाल्यांचा सांभाळ करावा लागत आहे. काही कर्मचा-यांना औषधोपचार न करता आल्याने प्राण गमवावे लागले. बीड जिल्हा कायम दुष्काळी असून रोजगारही मिळत नाही. शासनाने या बॅँकेचा निर्णय घेऊन ४ वर्षांचा कालावधी लोटला असून कर्मचाºयांना अद्याप काहीही मिळालेले नाही. त्यामुळे शासनाने ३१ जानेवारीपूर्वी ठोस निर्णय घ्यावा नसता कर्मचा-यांना सामूहिक आत्महत्येची परवानगरी द्यावी अशी मागणी तारामती सिरसट, सुभद्राबाई परबळे, रजिया बेगम जावेद नवाज, दैवशाला गोरे, वंदना वाघमारे, शे. सलीम, अशोक नागथई, शहादेव मिसाळ, भिवसेन जोगदंड, बाबासाहेब परजणे, ज्ञानोबा घोबाळे, शिवाजी राठोड, उत्तम केदार, भागवत मुरलीधर करडुले, ज्ञानदेव विधाते, अरुण लांडे, अनिल चौधरी, बाळनाथ घुमरे, व्ही. पी. परदेशी, जी. डी. नेलवाडकर, एस. बी. आवढाळ, एस. एस. खरात, जे. ई. नेटके, आर. एम. साळुंके आदींनी केली आहे.

Web Title: 9.5 crore of Beed's 94 employees in land development bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.