९९ महिलांना गरज नसताना गर्भपिशवी काढायचा सल्ला
By सोमनाथ खताळ | Published: December 31, 2023 07:10 AM2023-12-31T07:10:29+5:302023-12-31T07:11:20+5:30
...परंतु सरकारी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सांगत परवानगी नाकारली. गर्भपिशव्या काढण्याचा प्रकार उघड झाल्यावर शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सकांची परवानगी सक्तीची केली होती.
बीड : जिल्ह्यात मागील ५ वर्षांत ४,७१४ महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचे समोर आले. गरज नसतानाही ३ वर्षांत ९९ महिलांना गर्भपिशवी काढण्याचा सल्ला खासगी डॉक्टरांनी दिल्याचे उघड झाले. परंतु सरकारी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सांगत परवानगी नाकारली. गर्भपिशव्या काढण्याचा प्रकार उघड झाल्यावर शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सकांची परवानगी सक्तीची केली होती.
जिल्हा शल्यचिकित्सक काय म्हणतात?
लोकसंख्येच्या तुलनेत बीडमधील गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण २.७२ टक्के आहे. त्यामुळे प्रमाण वाढल्याचे म्हणता येणार नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे यांनी सांगितले.