बीड जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर ९९.९६ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:43+5:302021-07-17T04:26:43+5:30

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने शुक्रवारी दुपारी इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात ...

99.96 percent result in Beed district division | बीड जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर ९९.९६ टक्के निकाल

बीड जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर ९९.९६ टक्के निकाल

Next

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने शुक्रवारी दुपारी इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात ४० हजार ५३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बीड जिल्हा विभागात संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकावर राहिला. दरम्यान, दुपारी एक वाजेपासून निकाल दर्शविणाऱ्या बोर्डाच्या संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन झाल्याने उत्सुकता लागलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले. बीड जिल्ह्यातून ४० हजार ५४० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाती. त्यापैकी ४० हजार ५३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात २५ हजार ८३२ विद्यार्थी विशष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. ग्रेड १ मध्ये १३ हजार ५६१, ग्रेड २ मध्ये ११११, १८ विद्यार्थी ग्रेड पास, तर एकूण ४० हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे.

----------

तालुकानिहाय निकाल प्रविष्ट विशेष प्रावीण्य एकूण उत्तीर्ण निकाल

धारूर १०३४ ०६५७ १०३३

परळी ४२७९ २३७४ ४२७८ ९९.९७

केज ४१७१ ३१४० ४१६८ ९९.९२

अंबाजोगाई ४४७० २६७२ ४४६९ ९९.९७

माजलगाव ३५९९ १७९६ ३५९५ ९९.८८

गेवराई ४४९९ २६२९ ४४९८ ९९.९७

वडवणी १५७९ १०६५ १५७९ १००.००

शिरूर १८२१ १२२७ १८२१ १००.००

आष्टी ३९४३ २५३३ ३९४३ १००.००

पाटोदा १८२३ १२७३ १८२३ १००.००

बीड ९३१७ ६४६६ ९३१५ ९९.९७

----------

६५९ शाळांचा निकाल १०० टक्के

जिल्ह्यातील ६५९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून यंदा हा आकडा विक्रमी आहे. १३ शाळांचा निकाल पेक्षा कमी आहे. नोव्हेंबरमध्ये चार महिने प्रत्यक्ष वर्ग भरले. या कालावधीत ६० टक्के अभ्यास मुलांकडून करून घेण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे परीक्षा न होता नववीचे ५० टक्के व दहावीचे ५० टक्के गुणांवर मूल्यमापन करण्यात आले. नववीत मिळालेल्या कमी गुणांचा फटका मात्र अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे.

--------

निकालाच्या वेळीच लाईन ऑफ

कोरोनामुळे परीक्षा रद्द करून मूल्यांकन करण्यात आले. तरीही निकालाची विद्यार्थी व पालकांना उत्सुकता होती. परंतु शुक्रवारी निकाल जाहीर होताच संगणक, माेबाईलद्वारे सर्च करताना अनंत अडचणी आल्या. आधी वर्ग भरले नाही, नंतर भरले तर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे परीक्षा देता आली नाही. निकालाच्या वेळी सर्व्हर डाऊनमुळे लाईन ऑफ झाल्या. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा आनंद हिरावला.

---------

मुले का अनुत्तीर्ण झाली?

खरे तर यंदा दहावीचा निकाल १०० टक्केच लागायला हवा होता. नववीतील ५० टक्के गुण, दहावीचे अंतर्गत मूल्यमापनासह एकूण ५० गुण या आधारे झालेल्या निकालामुळे गळती होण्याचे काहीच कारण नाही; तरीही १३ मुले अनुत्तीर्ण का झाली, याचा शोध घ्यावा लागणार आहे.

Web Title: 99.96 percent result in Beed district division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.