मध्यरात्री वळण रस्त्यावर बस-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 11:59 AM2024-10-01T11:59:24+5:302024-10-01T11:59:48+5:30
बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळूज येथील घटना!
- नितीन कांबळे
कडा: शहरातील काम आवरून गावी परणाऱ्या एका युवकाचा बस आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळुज वाघळूज घडली. संदिप आश्रुबा आंधळे (३०, रा.लिंबोडी) असे मृत तरूणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील संदीप आश्रुबा आंधळे याच्याकडे एक टेम्पो आहे. त्याचा थकीत हप्ता भरण्यासाठी संदीप सोमवारी दुपारी अहमदनगरला दुचाकीवर गेला होता. तेथील काम आवरून रात्री तो दुचाकीवरून गावी परतत होता. दरम्यान, रात्री ११ वाजता बीड ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळूज येथील वळणार कळंब - बोरिवली बससोबत ( क्रमांक एम.एच ०९ एफ.एल.०५७२) संदीपच्या दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. यात संदीप याचा जागीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक मुकुंद एकशिंगे, पोलिस अंमलदार शिवदास केदार यांनी अपघातस्थळी धाव घेतली. मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी रवाना करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी अपघातग्रस्त बस पोलीस ठाण्यात आणली असून पुढील तपास सुरू आहे.