विजेच्या धक्क्याने मालवाहू जीपने घेतला पेट; पाच मजूर गंभीर जखमी

By संजय तिपाले | Published: November 21, 2022 11:29 AM2022-11-21T11:29:36+5:302022-11-21T11:30:16+5:30

आगीत वाहन जळून खाक झाले आहे

A cargo jeep caught fire due to lightning; Five laborers seriously injured | विजेच्या धक्क्याने मालवाहू जीपने घेतला पेट; पाच मजूर गंभीर जखमी

विजेच्या धक्क्याने मालवाहू जीपने घेतला पेट; पाच मजूर गंभीर जखमी

Next

बीड: गेवराई तालुक्यातील आडगाव येथे जनावरांना चारा आणण्यासाठी जाणाऱ्या मालवाहू गाडीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत. एका मजुराची प्रकृती चिंताजनक असून यामध्ये मालवाहू जीप जळून खाक झाली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली.

गेवराई तालुक्यातील आडगाव येथील हे मजूर जनावराला चारा आणण्यासाठी जात होते. यावेळी उजव्या कालव्यावर त्यांच्या गाडीला विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि यामध्येच गाडीने पेट घेतला.यात पाच मजूर विजेता शॉक लागून जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: A cargo jeep caught fire due to lightning; Five laborers seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.