वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अखेर केतकी चितळे अन् कार्यक्रम संयोजकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 07:23 PM2024-02-29T19:23:56+5:302024-02-29T19:25:12+5:30
परळी येथील आंबेडकरी बांधवांनी आणि सकल मराठा समाजाच्या वतीने परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
परळी : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे आणि कार्यक्रम संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये २९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे . दिनांक 25 फेब्रुवारी रोजी परळीत राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद झाली होती .या परिषदेत अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
परळी येथील आंबेडकरी बांधवांनी आणि सकल मराठा समाजाच्यावतीने परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शहर पोलीस स्टेशनला वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरून संयोजक बाजीराव धर्माधिकारी, केतकी चितळे यांच्या विरोधात कलम 295 (अ) तसेच कलम 505 (2) अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास परळी शहर चे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत