पोलमध्ये वीजप्रवाह उतरला; स्पर्श होताच शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 07:03 PM2023-06-29T19:03:54+5:302023-06-29T19:06:37+5:30

आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील घटना 

A current descends in the pole; The farmer died due to electric shock as soon as it was touched | पोलमध्ये वीजप्रवाह उतरला; स्पर्श होताच शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पोलमध्ये वीजप्रवाह उतरला; स्पर्श होताच शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

googlenewsNext

- नितीन कांबळे 
कडा -
घरासमोर असलेल्या खांबात विद्युतप्रवाह उतरल्याने जनावरांना चारापाणी करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने चिटकून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी अडीज वाजेच्या सुमारास आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथे घडली. युवराज उत्तम पडोळे ( ४२) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील युवराज पडोळे हे आज दुपारी घरासमोर बांधलेल्या जनावरांना चारापाणी करत होते. समोरच असलेल्या पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. अनावधानाने हात लागताच विजेचा धक्का बसून पडोळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

गावातील व वस्तीवरील विद्युत खांब मोडलेले आहेत, तारा जिर्ण झाल्या असून पावसाळ्याच्या तोंडावर त्याची दुरूस्ती करून नवीन रोहित्र बसवावेत अशी केली होती, मात्र महावितरणने दुर्लक्ष केल्याची माहिती सरपंच अजित घुले यांनी दिली.

Web Title: A current descends in the pole; The farmer died due to electric shock as soon as it was touched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.