अंबाजोगाईत बसमध्ये दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2023 06:58 PM2023-06-05T18:58:20+5:302023-06-05T18:58:36+5:30
दोन महिला जेरबंद; चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अंबाजोगाई - येथील बस स्थानकात महिलांचे दागिने चोरणार्या टोळीने उच्छाद मांडला होता. सततच्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे अंबाजोगाई शहर पोलिसांनी गंभीर दखल घेत कसून तपास करत दागिने चोरणार्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून दोन महिलांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल ३ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई बसस्थानक येथे लग्न सराईच्या गर्दीचा फायदा घेवून महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे, पर्स मधील पैसे, दागिणे चोरीचे गुन्हे अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला ६ गुन्हे दाखल होते. बसस्थानक येथे होणाऱ्या चोऱ्यावर आळा घालण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबाजोगाई, अनिल चोरमले यांनी शर्तीचे प्रयत्न करून अंबाजोगाई विभाग अंतर्गत पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना दिलेल्या होत्या.
सदर पथकांनी गुन्हे घडल्याचे ठिकाणचे सी.सी.टि.व्ही फुटेज, गोपनिय बातमीदार नेमुन, शर्थीचे प्रयत्न करून मिराबाई दत्तात्रय काळे वय ४९ वर्षे रा. जायकवाडी सरकारी दावाखान्याचे पाठीमागे सोनपठे जि. परभणी, पुजा उदयराज भोसले वय २१ वर्षे रा. पोंडुळ ता. सोनपेठ जि. परभणी, रविद्र प्रकाश ऊंडानशिव व ४४ वर्षे रा. गंगाखेड जि. परभणी यांना अटक करून त्यांचेकडून पोस्टे अंबाजोगाई शहरच्या ४ गुन्हयातील चोरी गेलेले ६ तोळे सोने किमंती ३,३९,००००/- व नगदी रोख ५२०००/- रुपये असे एकुण ३,९१,०००/- (तीन लाख ऐक्यान्नव हजार) रुपयाचा माल जप्त केला आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबाजोगाई, अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली, विनोद घोळवे पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर, चाँद मेंडके पोलीस उपनिरीक्षक पोस्टे अंबाजोगाई अर्सुळ, घोळवे, वडकर, नागरगोजे, चादर, लाड, सांळुके, तसेच पोह भास्कर केंद्रे, सचिन सानप, तेजस वाव्हळे यांनी केली आहे. भविष्यातही चोरी करणारे, गुंडगिरी करणारे व कायद्याला न जुमाननाऱ्या व्यक्ती विरुद्ध कठोर कार्यवाही करण्याचे संकेत नंदकुमार ठाकुर पोलीस अधिक्षक बीड व अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी दिले आहे.