गोठ्यात बांधलेल्या शेळ्यावर बिबट्याचा हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 06:39 PM2023-11-04T18:39:16+5:302023-11-04T18:39:44+5:30
डोंगरपट्यात पुन्हा एकदा बिबट्याचा संचार होऊ लागल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.
- नितीन कांबळे
कडा-घरापासून जवळच असलेल्या गोठ्यातील शेळ्यावर रात्रीच्या वेळी अचानक बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात एक बोकड जागीच ठार झाले तर एक शेळी जखमी झाली आहे. डोंगरपट्यात पुन्हा एकदा बिबट्याचा संचार होऊ लागल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.
सागर सुनिल ओव्हाळ हे आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे राहतात. गुरुवारी सायंकाळी सागर यांनी नेहमीप्रमाणे घरापासून जवळच असलेल्या गोठ्यात एक बोकड,एक शेळी बांधल्या. शुक्रवारी पहाटे अचानक बिबट्याने गोठ्यातील शेळ्यावर हल्ला चढवल. हल्ल्यात बोकडाचा मृत्यू झाला तर अन्य एक शेळी जखमी झाली.
दरम्यान, सु.देवळा परिसरात बिबट्याचा संचार होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वनविभागाकडुन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी,वनरक्षक विधाते मॅडम, वनमजूर यांनी भेट देत पंचनामा केला आहे.