परळीच्या श्रद्धाची दमदार कामगिरी; 'स्केटबोर्डिंग' स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 07:24 PM2022-10-06T19:24:46+5:302022-10-06T19:25:25+5:30
श्रद्धा गायवाडची आता फ्रांसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिकसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
परळी: अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने स्केट बोर्डिंग या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. या विजयासह तिची स्केट बोर्डिंग या क्रीडा प्रकारात फ्रांसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या विजयामुळे श्रद्धा गायकवाडने परळीचे नाव उंचावले आहे. श्रद्धा परळीतील सुप्रसिध्द जाहिरात समालोचक बालाजी गायकवाड यांची पुतणी आहे, तर तिचे वडील रविंद्र गायकवाड पुण्यातील एका खाजगी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. अतिशय बिकट परिस्थितीमधून श्रद्धाने ही कामगिरी पूर्ण केली आहे.
श्रद्धाच्या कामगिरीवर अभिनव विद्यालयाचे सचिव साहेबराव फड व शिक्षकांनी तिचे कौतूक केले आहे. आता फ्रांसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिकमध्ये श्रध्दाने सुवर्णपदक जिंकावे आणि परळीचे नाव संपूर्ण विश्वात करावे, अशा शुभेच्छा माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी परळीकरांच्या वतीने तिला दिल्या.