ट्रकने हुल दिल्याने खाजगी बस खड्ड्यात कोसळली; नशीब बलवत्तर म्हणून वाचले ४० प्रवाशांचे प्राण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:11 PM2023-11-25T12:11:01+5:302023-11-25T12:15:04+5:30
सुदैवाने या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नसून ट्रॅव्हल्समधील सर्व ४० प्रवासी सुरक्षित आहेत.
- नितीन कांबळे
कडा (बीड) : शुक्रवारी रात्री पुण्याहून नांदेडला निघालेल्या माऊली ट्रॅव्हल्सच्या बसला बीडवरून अहमदनगरकडे जाणार्या एका ट्रकने हुल दिली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून खड्ड्यात कोसळली. नशीब बलवत्तर म्हणून बसमधील ४० प्रवाशांचा जीव वाचला. हा अपघात बीड- धामणगाव-नगर राज्य महामार्गावरील सांगवी(पाटण)येथे आज पहाटे एक वाजेच्या दरम्यान घडला.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, माऊली ट्रॅव्हल्सची एक बस ( एम.एच क्रमांक २२.३८६७ ) पुण्याहून ४० प्रवाशांना घेऊन घेऊन बीडमार्ग नांदेडला जात होती. तर बीडहून अहमदनगरकडे एक ट्रक सुसाट वेगात जात होता. पहाटे १ वाजेच्या सुमारास बीड- धामणगाव-नगर राज्य महामार्गावरील सांगवी(पाटण)येथे ट्रकने हुल दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रोडलगत असलेल्या खड्ड्यात गेली.
नशीब बलवत्तर म्हणून वाचला ४० प्रवाशांचे प्राण! ट्रकने हुल दिल्याने खाजगी बस खड्ड्यात, बीड-धामणगाव-नगर राज्यमहामार्गावरील सांगवी(पाटण) येथे पहाटेचा अपघात.#Accidents#beedpic.twitter.com/eMBZV7HRvp
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) November 25, 2023
सुदैवाने या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नसून ट्रॅव्हल्समधील सर्व ४० प्रवासी सुरक्षित आहेत.दरम्यान, अपघात झाल्यानंतर पहाटेच पर्यायी व्यवस्था करत प्रवाशांना पुढे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.