'एकच मिशन...'; मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याने संपवले जीवन
By सोमनाथ खताळ | Published: January 1, 2024 07:12 PM2024-01-01T19:12:10+5:302024-01-01T19:12:34+5:30
मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी : मयताच्या खिशात आढळली चिठ्ठी
धारूर : एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा असा मजकूजर चिठ्ठीत लिहून शेतकऱ्याने बोरीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना धारूर तालुक्यातील आवरगाव येथे सोमवारी उघडकीस आली. जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी गेला आहे. गणेश विठ्ठलराव नखाते (वय ५०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी त्यांनी चिठ्ठी लिहून जीवन संपविले.
नखाते यांच्या मुलाचे उच्च शिक्षण झालेले आहे. असे असतानाही केवळ आरक्षण नसल्याने त्याला शासकीय नौकरी नाही. आता मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी २० जानेवारीच्या आगोदर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करत नखाते यांनी चिठ्ठीत मुलगा व सून उच्चशिक्षित असून त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही हे डोक्यात घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे व त्यांनी आत्महत्या करत असताना चिठ्ठी लिहून गळफास घेतला. पोलिसांना समजताच त्यांनी धाव घेत माहिती घेतली. नखाते यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.