धारुरच्या ऐतिहासिक होळी उत्सवात रंगांची उधळण; सतत पाच दिवस चालतो उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2023 05:44 PM2023-03-07T17:44:19+5:302023-03-07T17:44:34+5:30

धारूर शहरातील रंगपंचमी उत्सवास ऐतिहासिक महत्त्व आहे.

A splash of color at Dharur's historic Holi festival; The festival continues for five days | धारुरच्या ऐतिहासिक होळी उत्सवात रंगांची उधळण; सतत पाच दिवस चालतो उत्सव

धारुरच्या ऐतिहासिक होळी उत्सवात रंगांची उधळण; सतत पाच दिवस चालतो उत्सव

googlenewsNext

धारूर - धारुर शहराला ज्या प्रमाणे ऐतिहासिक परंपरा आहे. त्याचप्रमाणे येथील होळी उत्सवासही ऐतिहासिक परंपरा आहे. या ठिकाणी राहणारा राजपूत समाज हा उत्सव सतत पाच दिवस साजरा करतो. होळीच्या दिवसापासून होळी पेटून या उत्सवाची सुरुवात होते, धुलीवंदनापासून रंगपंचमीपर्यंत रोज शहरातून वाजत गाजत दुपारी व सायंकाळी चाचर काढून हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. चाचरीक सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक गीते गात झांझ ढोलकी वाजवत ही चाचर काढण्यात येते.

धारूर शहरातील रंगपंचमी उत्सवास ऐतिहासिक महत्त्व आहे. या शहरातील राजपूत समाजाच्या वतीने होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी होळी पेटवून या उत्सवाची सुरुवात होते. धुलीवंदनाच्या दिवसा पासून रोज दुपारी ढोलकी झांज वाजवत शहरातील कटघरपुरा भागातील हनुमान मंदिरा पासून या चाचणीची सुरुवात होते. दिवसाच्या चाचरी मध्ये रंगाची ही उधळण केली जाते व येणाऱ्या जाणाऱ्यांनाही रंग लावला जातो. धार्मिक, सांस्कृतीक, देशप्रेमी गीते म्हणत ही चाचर मुख्य रस्त्याने काढून शहरातील क्रांती चौकातील मारवाडी समाजाच्या बालाजी मंदिरा पर्यंत आणण्यात येते. तेथून परत ति कटघरपुरा भागात जाते या रंगपंचमी उत्सवात विशेष असे महत्त्व असून रोज एकाचा रंगाचा मान आहे.

हा होलीचा उत्सव गेल्या अनेक वर्षा पासून मोठ्या उत्साहात राजपूत समाज बांधव साजरा करतात. या ही वर्षी पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येत असून धुलीवंदना दिवशी चाचर काढून या उत्सवाची उत्साहामध्ये सुरुवात करण्यात आली. या उत्साहात राजपूत समाजबांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. पाच दिवस हा होळी उत्सव साजरा केला जातो.

Web Title: A splash of color at Dharur's historic Holi festival; The festival continues for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.