तीन वर्षांचा चिमुकला नालीत थेट नदीपात्रात वाहून गेला; पावसामुळे शोधकार्यात अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 05:17 PM2022-09-26T17:17:25+5:302022-09-26T17:17:54+5:30
पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बंटी वाहून गेला. हा नाला पुढे विद्रुपा नदीला जावून मिळतो.
गेवराई (बीड): शाळातून घरी येणाऱ्या एका तीन वर्षीय चिमुकला नाल्यात वाहून गेल्याची घटना शहरातील चिंतेश्वर गल्ली भागात आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. बंटी ज्ञानेश्वर क्षीरसागर असे चिमुकला असे चिमुकल्याचे नाव आहे. दरम्यान, जोरदार पाऊस सुरु असल्याने शोधकार्यात अडथळा येत आहे.
आज दुपारी १ वाजेच्या सुमारास बंटी शाळेतून घरी आला. त्यावेळी जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे घराजवळील नालीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. बंटी अचानक या नालीत पडला. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बंटी वाहून गेला. हा नाला पुढे विद्रुपा नदीला जावून मिळतो.
बंटी वाहून गेल्याची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी शोधकार्य सुरु केले. मात्र, नदी पात्रात घाण असल्याने शोधकार्यात अडथळा येत आहे. घटनास्थळी तहसीलदार सचिन खाडे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळसह कर्मचारी व नागरिक शोध कार्यात सहभागी आहेत.