हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन; कड्यात वारकऱ्यांना २१ वर्षांपासून मुस्लिम बांधव देतात पंगत!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 05:10 PM2024-07-08T17:10:59+5:302024-07-08T17:12:28+5:30
सर्वधर्म समभावाचे प्रतिक; बीड जिल्ह्यातील कडा येथे मागील २१ वर्षांपासून मुस्लिम बांधव दिंडीत सामील होत देतात पंगत
- नितीन कांबळे
कडा- गळ्यात टाळ,मुखी नामाचा गजर,खांद्यावर भगवी पताका घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मदन महाराज दिंडीतील वारकऱ्यांना २१ वर्षांपासून कडा येथील तांबोळी भावडं महाप्रसादाची पंगत देऊन दिंडीत हिंदू-मुस्लिम एकोप्याने दर्शन घडवत असल्याचे दिसुन येत आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील संत मदन महाराज यांची दिंडी दरवर्षीप्रमाणे रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले.यामध्ये शेकडो वारकरी असतात.याच वारकऱ्यांना गेल्या २१ वर्षांपासून महाप्रसाद देऊन हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडविले जाते. दिंडीचे प्रस्थान होत असताना गळ्यात टाळ, मुखी नामाचा गजर, खांद्यावर भगवी पताका घेत फुगडीचा आनंद लुटत कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी व कांद्याचे प्रसिद्ध व्यापारी बबलू तांबोळी ही भावंडे सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून दिंडीतील शेकडो वारकऱ्यांना महाप्रसाद देतात. वाजत गाजत, नामाच्या जयघोषात सर्व समाजातील भाविक हजेरी लावतात. मग दिंडीचे प्रस्थान पंढरपूरकडे होते.
सर्वधर्म समभावाचे प्रतिक; बीड जिल्ह्यातील कडा येथे मागील २१ वर्षांपासून मुस्लिम बांधव देतात वारकऱ्यांना महापंगत #beednews#aashadhiekadamipic.twitter.com/DTmsaW9eSv
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) July 8, 2024
सर्वधर्म समभावाचे प्रतिक
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून हिंदू-मुस्लिम एकत्र येऊन दिंडीत सहभागी होतोत.दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महाप्रसाद देण्यात आला. आम्ही एक दिलाने आणि एक विचाराने गुण्यागोविंदाने दिंडीत सहभागी होऊन आनंद व्यक्त करत असल्याचे सभापती रमजान तांबोळी यांनी लोकमतला सांगितले.