युवकाने अंगावर ओतले डिझेल, वेळीच केले परावृत्त; बीड तालुक्यातील कुटेवाडीतील घटना
By अनिल भंडारी | Published: September 10, 2023 04:37 PM2023-09-10T16:37:44+5:302023-09-10T16:37:56+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील कुटेवाडी फाटा येथे उपोषण सुरू होते.
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील कुटेवाडी फाटा येथे उपोषण सुरू होते. रविवारी ११ वाजेच्या सुमारास घोषणाबाजी सुरू असतानाच एका युवकाने स्वत:च्या खिशातून बाटली काढत डिझेल अंगावर ओतले. दरम्यान प्रसंगावधान राखत ग्रामस्थ आणि पोलिसांनी धाव घेत वेळीच या युवकाला ताब्यात घेत त्याला आत्मदहनापासून परावृत्त केले.
दादा वरपे असे डिझेल अंगावर ओतून घेणाऱ्या तरूणाचे नाव आहे. कुटेवाडी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नंदकुमार कुटे हे चार दिवसांपासून उपोषण करीत आहेत. रविवारी दादा वरपे याने डिझेल आतल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी कुटे यांनीही धाव घेतल्याने त्यांना चक्कर आली. त्यामुळे उपचारासाठी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या दादा वरपे यास पोलिसांनी नोटीस जारी करून कारवाईचा इशारा दिला आहे.