कौतुकास्पद! आडस ट्रेकर्स ग्रुपने वाचवला मुक्या प्राण्याचा जीव; खड्डयात अडकलेल्या गायीची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 02:22 PM2022-01-16T14:22:33+5:302022-01-16T14:47:06+5:30

आडस ट्रेकर्स ग्रुपने खूप संवेदनशील कार्य केले आहे.

Aadas Trekkers group rescues the cow trapped in the pit | कौतुकास्पद! आडस ट्रेकर्स ग्रुपने वाचवला मुक्या प्राण्याचा जीव; खड्डयात अडकलेल्या गायीची सुटका

कौतुकास्पद! आडस ट्रेकर्स ग्रुपने वाचवला मुक्या प्राण्याचा जीव; खड्डयात अडकलेल्या गायीची सुटका

Next

नेहमीप्रमाणे दर रविवारी आडस ट्रेकर्स ग्रुप ट्रेकिंग व पर्यटन उपक्रम राबवित असतो. धारूरच्या बालाघाट डोंगर रांगात निर्सगात फिरायला आल्यानंतर तिकडे एका नदीच्या पात्रात चिखलगाळात खोल खड्डयात एक गाय फसली होती. सलग अंदाजे दोन दिवसांपासून त्या ठिकाणी ती गाय फसली होती. ट्रेकिंग करीत असताना ग्रुपला ती गाय दिसली व संपूर्ण ग्रुप तिला बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावला. अथक प्रयत्न करून ही गायीचे पाय खड्यातून बाहेर निघत नव्हते. तर सर्वांनी विशेषतः लहान मुलांनी,युवकांनी व संतोष चवार व सतीश आढाव यांनी अनेक युक्त्या वापरून त्या गायीला सुखरूप बाहेर काढले. 

गाय पूर्णपणे तहानलेली होती, भुकेली होती. किती दिवसाने फसली होती? हे कळू शकले नाही, पण गायीची अवस्था खूपच कमकुवत झालेली होती. शरीरात गायीच्या त्राण राहिले नव्हते. तिला हळूच बाहेर काढले. पाणी पाजले व खायला दिले. आडस ट्रेकर्स ग्रुपने खूप संवेदनशील कार्य केले आहे. ग्रुपचा खूप अभिमान वाटत आहे. चांगल्या सवयी असल्या की निश्चित जीवनात खूप चांगल्या कार्याची सुरुवात होते, हे यावरून समजते. असे पर्यावरणपूरक कार्य आपल्या हातून नेहमी होवोत असं म्हटलं आहे. 


 

Web Title: Aadas Trekkers group rescues the cow trapped in the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.